Rohit Sharma & T20 World Cup 2024 : रोहित शर्मा 2024 च्या T20 विश्वचषक स्पर्धेत भारतीय क्रिकेट संघाचे नेतृत्व करणार आहे. 2007 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा रोहित शर्मा आत्तापर्यंत खेळलेल्या सर्व आठ T20 विश्वचषकांचा भाग आहे आणि तो स्पर्धेच्या 9व्या आवृत्तीतही खेळताना दिसणार आहे.
रोहित शर्मा जून 2024 पासून खेळल्या जाणाऱ्या टी-20 विश्वचषकाच्या 9व्या आवृत्तीत भारतीय कर्णधार म्हणून मैदानात उतरणार आहे. याआधी रोहित शर्माने 2022 मध्ये झालेल्या टी-20 विश्वचषकातही भारताची कमान सांभाळली होती. शाकिब अल हसन आणि रोहित शर्मा हे दोनच खेळाडू आहेत ज्यांनी आतापर्यंत टी-20 विश्वचषकाच्या प्रत्येक आवृत्तीत भाग घेतला आहे. तर रोहित शर्मा हा अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय ठरणार आहे.
टी20 विश्वचषक 2007 मध्ये सुरू झाला, ज्यामध्ये भारतीय संघाने एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली विजेतेपद पटकावले. रोहित शर्मा पहिल्या T20 विश्वचषकात भारतीय क्रिकेट संघाचा भाग होता. यानंतर, 2009 मध्ये खेळल्या गेलेल्या दुसऱ्या, 2010 मध्ये तिसऱ्या, 2012 मध्ये चौथ्या, 2014 मध्ये पाव्या, 2016 मध्ये सहाव्या, 2021 मध्ये सातव्या आणि 2022 मध्ये आठव्या T20 विश्वचषकात देखील रोहित शर्मा भारतीय संघाचा भाग होता.
गेल्या मोसमात टीम इंडियाने गाठली होती उपांत्य फेरी…
रोहित शर्माने शेवटच्या म्हणजेच 2022 च्या T20 विश्वचषकात भारतीय संघाची कमान सांभाळली होती. रोहितच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने चमकदार कामगिरी करत स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली. पण सेमीफायनलमध्ये मेन इन ब्लू संघाला इंग्लंडविरुद्ध 10 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला. अशा परिस्थितीत रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाकडून चाहत्यांना पुन्हा एकदा अपेक्षा असतील.
रोहित शर्माची T20 आंतरराष्ट्रीय कारकीर्द…
रोहित शर्माने सप्टेंबर 2007 मध्ये टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. आतापर्यंत त्याने 151 सामने खेळले आहेत. या सामन्यांच्या 143 डावांमध्ये फलंदाजी करताना रोहितने 31.79 च्या सरासरीने आणि 139.97 च्या स्ट्राइक रेटने 3 हजार 974 धावा केल्या आहेत. या कालावधीत, त्याने 5 शतके आणि 29 अर्धशतके केली आहेत, ज्यामध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या नाबाद 121* धावा आहे.