नगर – निंबळक सेवा सोसायटीच्या वतेने कर्जदार सभासदांची पुर्वीसारखीच कपात करण्यात यावी. पाच एकर पेक्षा कमी क्षेत्र त्यांच्याकडुन 700 रुपये व 5 एकर पेक्षा पुढे क्षेत्र असलेल्यांकडून 1 हजार रुपये शेअर्स घेण्यात यावे, असा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला आहे. या निर्णयाचे शेतकऱ्यामधून स्वागत होत आहे.
निंबळक सोसायटीची बैठक शुक्रवार (दि.10) रोजी ग्रामपंचायत कार्यालयात पार पडली. या बैठकित जिल्हा परिषद सदस्य माधवराव लामखडे यांनी कर्जदार सभासदांची शासनाच्या मार्गदर्शक परिपत्रकानुसार 10 टक्के शेअर्स कपात करण्यात आली होती. ती सरसकट न करता पुर्वीसारखीच या वर्षी ही कपात करण्यात यावी अस ठराव मांडला. या ठरावाला सोसायटीचे अध्यक्ष पोपट खामकर, उपाध्यक्ष ज्ञानदेव कोतकर व सर्व सोसायटी सदस्यांनी अनुमती देत ठराव बहुमताने मंजूर करण्यात आला.
यावेळी सुरेश गायकवाड, बाळासाहेब जाजगे, अविनाश आळंदीकर, रावसाहेब घोलप, सोपान कुलट, किसन शिंदे, रावसाहेब म्हस्के, मंदा गेरंगे, विलासराव लामखडे, सचिव रमेश जासुद यांनी लेखी सहमती दर्शवली. निवडणुकीच्या तोंडावर विरोधकांनी राजकारण केले.