उन्हाळ्यात गरम पाण्याने अंघोळ करण्याने अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.
गरम पाण्यापेक्षा थंड पाण्याने अंघोळ केल्यास रोगप्रतिकारशक्ती चांगली राहते. थंड पाण्याने अंघोळ केल्यास वजन कमी होण्यास मदत होते. थंड पाण्याने त्वचा चमकदार होते. उन्हाळ्यात गरम पाण्याने अंघोळ केल्यास त्वचा कोरडी पडते. त्यामुळे संसर्ग होण्याचा धोका अधिक असतो. थंड पाण्याने त्वचा कोरडी पडत नाही, रुक्ष होत नाही. जास्त गरम पाण्याने अंघोळ केल्यास त्वचेवर सुरकुत्या पडण्याचा धोका असतो. थंड पाण्याने आंघोळ केल्याने तणाव कमी होतो. उत्साह वाढतो. त्यामुळे उन्हाळ्याच्या उष्ण दिवसांत अति गरम किंवा गरम पाण्याने अंघोळ करणं टाळा. थंड पाण्याचा वापर करा अणि दिवसभर उत्साही राहा.
उन्हाळ्यात रात्रीची आंघोळ लाभदायक
बाहेरील तापमान वाढल्यानंतर त्याचा परिणाम शरीरावर देखील होत असतो. या वर्षी तर उन्हाळा अधिकच कडक आहे. सूर्य दिवसागणिक अधिकाधिक आग ओकतच चालला आहे. तापमान सहजपणे 40 च्या पुढे जात आहे. उन्हाचा कहर वाढत चालल्याने त्याचा स्वास्थ्यावर परिणाम होत चालला आहे. सकाळी आंघोळ करुन आपण घरून निघाल्यापासून घामाच्या धारा यायला सुरुवात होते. घामामुळे त्वचा ओलसर असल्याने धूळ आणि माती शरीराला चिकटू लागते. यामुळे शरीरावर घाम आणि मळ जमा होतो. तसेच अति घामामुळे शरीराला दुर्गंधी येऊ लागतो.
या साऱ्यातून वाचण्यासाठी काही लोक घरी संध्याकाळी वा रात्री घरी गेल्यावर पुन्हा एकदा आंघोळ करतात, तर काही हात पाय धुवून कपडे बदलतात. दिवसाच्या दररोज सकाळी तर सर्वच जण आंघोळ करतात. पण तुम्ही जर रात्रीही आंघोळ करत असाल तर त्वचेसंदर्भातील आजारापासून दूर राहू शकाल. रात्री घरी आल्यानंतर तुम्ही आंघोळ केली, तर तुमचा दिवसभराचा थकवा दूर होतो, तन आणि मनाने तुम्ही फ्रेश झाला असाल तर तुम्हाला रात्रीची शांत झोप येऊ शकेल.
रात्री केलेल्या स्नानाचे काही फायदे-
हृदय स्वास्थ्य
रात्रीच्या वेळी रक्ताचा प्रवास संथ गतीने होत असतो. अशा वेळी तुम्ही स्वच्छ पाण्याने स्नान कराल तर रक्त प्रवाह खूप चांगला होईल. हृदयावरही याचा सकारात्मक परिणाम होतो. जर तुम्हाला तुमच्या हृदयाचे स्वास्थ्य हवे असेल तर तुम्हाला रात्रीच्या आंघोळीची सवय लावायला हवी.
फ्रेश वाटेल
गरमीच्या दिवसात ऊन, धूळ आणि घामामुळे शरीरावर मळ जमा होतो. रात्रीच्या आंघोळीने शरीर स्वच्छ होते. आंघोळीनंतर तुम्ही फ्रेश आणि ताजेतवाने होता.
शांत झोप येईल
गरमीमुळे तणाव येतो आणि शरीर दमल्यासारखे होते. अशा वेळी रात्रीच्या आंघोळीने शरीराचा तणाव कुठच्या कुठे जाईल आणि अंथरुणात पडल्या पडल्या तुम्हाला झोप येईल.
रोगप्रतिकारक शक्ती
गरमीमुळे आपण अनेक गंभीर आजार ओढवून घेतो. यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्तीही आपण कमी करून घेतो. रात्रीच्या वेळी स्वच्छ पाण्याने आंघोळ केल्याने तुमची रोग प्रतिकारक शक्ती वाढू शकते.
हाय ब्लड प्रेशरची समस्या असल्यास गरम पाण्याने अंघोळ करावी. याने शरीरातून घाम निघून शरीराचं तापमान सामान्य राहण्यास मदत मिळते.