मुंबई/नवी दिल्ली – शरद पवार गटाच्या वतीने निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. निवडणूक आयोगांना अजित पवार गटाला राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्षाचे नाव आणि घड्याळ हे निवडणूक चिन्ह दिले होते.
निवडणूक आयोगाच्या या निर्णयाला स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी शरद पवार गटाच्या वतीने करण्यात आली आहे. तसेच याबाबत लवकरात लवकर सुनावणी घ्यावी, असे देखील या याचिकेमध्ये नमूद करण्यात आले आहे. या याचिकेवर पुढील आठवड्यात सुनावणी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ हे निवडणूक चिन्ह या बाबत घेतलेल्या सुनावणी नंतर पक्ष आणि निवडणूक चिन्ह हे अजित पवार गटाला दिले आहे. त्यामुळे शरद पवार गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे. सर्वोच्च न्यायालयात आम्हाला नक्कीच न्याय मिळेल, असे देखील शरद पवार गटाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
निवडणूक आयोगाचा निर्णय आल्यानंतर अजित पवार हे गटाने देखील सुप्रीम कोर्टात कॅव्हेट दाखल केलेली होते. शरद पवार गटाच्या वतीने या निर्णयाला दाद मागत आव्हान देण्यात येईल, असे अजित पवार गटाला आधीच माहिती होते. त्यामुळे त्यांनी या प्रकरणी आपली देखील बाजू ऐकून घेण्यात यावी यासाठी आधीच कॅव्हेट दाखल केलेली आहे.