Maharashtra Weather| राज्यातील काही भागात उष्णतेची लाट असल्याने नागरिकही हैराण झाले आहेत. यातच आता पुढील चार दिवस अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. पूर्व विदर्भासह पश्चिम महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊसाने हजेरी लावली आहे. तर काही भागात गारपीट झाल्याचे देखील पाहायला मिळत आहे. त्यामुळे येथे पुढील चार दिवस अवकाळी पावसाची शक्यता कायम असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
कोठे बरसणार पाऊस? Maharashtra Weather|
विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी पुढील चार दिवस विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. अकोला, बुलढाणा अमरावती, हिंगोली, लातूर, वाशीम, आणि नांदेड येथे काही ठिकाणी विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
मुंबईसह कोकणात उन्हाचा तडाखा Maharashtra Weather|
तर दुसरीकडे, मुंबईसह कोकणात उष्णतेची लाट पाहायला मिळत आहे. मुंबईसह कोकणात पुढील चार दिवसात उन्हाच्या तडाखा असणार आहे. मुंबई, ठाणेसह कोकणात तापमानात किंचित वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे येथे नागरिकांना आणखी काही दिवस उन्हाचा तडाखा सहन करावा लागणार आहे.
हेही वाचा:
“मेलो तरी चालेल पण कमळ, हात आणि धनुष्यबाण चिन्हावर…”; महादेव जानकरांचे विधान