All IPL Teams Owners His Captain Salary : आयपीएल 2024 मध्ये एकूण 10 संघ खेळत आहेत. यात चेन्नई सुपर किंग्ज, मुंबई इंडियन्स, सन रायझर्स हैदराबाद, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, कोलकाता नाइट रायडर्स, दिल्ली कॅपिटल्स, पंजाब किंग्स, राजस्थान रॉयल्स, लखनौ सुपर जायंट्स, गुजरात टायटन्स या संघांचा समावेश आहे. पण आयपीएलमध्ये खेळणाऱ्या सर्व संघांचे मालक आणि संबंधित संघांच्या कर्णधारांचा पगार तुम्हाला माहीत आहे का?
Delhi Capitals : दिल्ली कॅपिटल्सच्या मालकाचे नाव पार्थ जिंदाल आहे. पार्थ जिंदाल जीएमआर ग्रुप आणि जेएसडब्ल्यू ग्रुप संभाळतात. दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंतचा पगार 16 कोटी रुपये आहे.
Punjab Kings : प्रीती झिंटा व्यतिरिक्त पंजाब किंग्जचे मालक नेस वाडिया, मोहित वर्मन आणि करण पाल आहेत. पंजाब किंग्जचा कर्णधार शिखर धवनचा पगार 8.25 कोटी रुपये आहे.
Mumbai Indians : मुंबई इंडियन्सचे मालक मुकेश अंबानी आहेत. तसेच मुकेश अंबानी रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक आहेत. मुंबई इंडियन्स कर्णधार हार्दिक पांड्याला 15 कोटी रुपये मानधन देते.
Kolkata Knight Riders : शाहरुख खान व्यतिरिक्त जुही चावला आणि जय मेहता यांच्याकडे कोलकाता नाईट रायडर्सची धुरा आहे. कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार श्रेयस अय्यरचा पगार 12.25 कोटी रुपये आहे.
Rajasthan Royals : राजस्थान रॉयल्सच्या मालकाचे नाव मनोज बदाले आहे. तसेच मनोज बदाले हे ब्लेहम चालकोटचा मालक आहेत. त्याचवेळी राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनला 14 कोटी रुपये मानधन मिळते.
Royal Challengers Bengaluru : विजय माल्ल्या हा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा पहिला मालक होता. पण आता या संघाची जबाबदारी युनायटेड स्पिरिटवर आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार फाफ डू प्लेसिसचा पगार 7 कोटी रुपये आहे.
Gujarat Titans : गुजरात टायटन्स संघ सीव्हीसी कॅपिटल पार्टनर कंपनीच्या मालकीचा आहे. त्याचवेळी या संघाने हार्दिक पांड्यानंतर शुभमन गिलला कर्णधार बनवले. गुजरात टायटन्स आपल्या कर्णधाराला 8 कोटी रुपये मानधन देते.
Lucknow Super Giants : डाॅ. संजीव गोयंका हे लखनौ सुपर जायंट्सचे मालक आहेत. तसेच संजीव गोयंका हे आरपी संजीव गोएंका गटाचे नेतृत्व करतात. त्याचबरोबर लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुलचा पगार 17 कोटी रुपये आहे.
Sunrisers hyderabad : काव्या मारन सनरायझर्स हैदराबादची मालकीण आहे. सनरायझर्स हैदराबाद संघ सन ग्रुपच्या मालकीचा आहे. या संघाचा कर्णधार पॅट कमिन्सचा पगार 20.5 कोटी रुपये आहे. सनरायझर्स हैदराबादने 2024 च्या आयपीएल लिलावात मोठी रक्कम खर्च करून पॅट कमिन्सला त्यांच्या संघात सामील केले.
Chennai Super Kings : चेन्नई सुपर किंग्जच्या मालकाचे नाव आहे एन श्रीनिवासन. तसेच एन श्रीनिवासन हे इंडिया सिमेंट कंपनीचे मालक आहेत. या संघाचा कर्णधार रुतुराज गायकवाड याचे वेतन 6 कोटी रुपये आहे.