Punjab Kings vs Royal Challengers Bengaluru, Toss : आज आयपीएल 2024 मध्ये, रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि पंजाब किंग्ज यांच्यात सामना होणार आहे. हा सामना दोन्ही संघांसाठी करा किंवा मरो असा होणार आहे. सामन्यास थोड्याच वेळात म्हणजे संध्याकाळी 7.30 वाजता सुरूवात होईल. वास्तविक, आज जो संघ पराभूत होईल तो प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडेल. अशा स्थितीत दोन्ही संघ विजयासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतील.
तत्पूर्वी झालेला नाणेफकीच्या कौल (Toss Update) पंजाब किंग्ज संघाच्या बाजूनं लागला आहे. पंजाबचा कर्णधार सॅम करन याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
🚨 Toss 🚨@PunjabKingsIPL win the toss and elect to bowl against @RCBTweets
Follow the Match ▶️ https://t.co/49nk5rrUlp#TATAIPL | #PBKSvRCB pic.twitter.com/xTTDA9yso7
— IndianPremierLeague (@IPL) May 9, 2024
दरम्यान, आरसीबीचे 11 सामन्यात 8 गुण आहेत आणि जर आरसीबीने तिन्ही सामने जिंकले तर प्लेऑफमध्ये पोहोचण्याची शक्यता वाढेल. पंजाब किंग्जचीही तीच अवस्था आहे. पंजाबही आठव्या स्थानावर आहे. त्याचे देखील 8 अंक आहेत. मात्र, या दोन संघांपैकी एकालाच 14 गुणांचा टप्पा गाठता येणार आहे.
मुंबई इंडियन्सचा संघ बुधवारी प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला. त्याच वेळी, आता एलिमिनेशनचा टप्पा सुरू झाला आहे. आजच्या सामन्यात पराभूत होणारा संघही बाहेर पडेल. पराभूत संघाचे 12 सामन्यांतून आठ गुण असतील आणि ते जास्तीत जास्त 12 गुणांपर्यंत पोहोचण्यास सक्षम असतील, जे प्लेऑफसाठी पात्र ठरण्यासाठी पुरेसे नसतील. विजेत्या संघाच्या आशा जिवंत राहतील. मात्र, त्याला इतर संघांच्या निकालावरही अवलंबून राहावे लागणार आहे.
आयपीएलमध्ये पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात 32 सामने खेळले गेले आहेत. यापैकी 17 पंजाबने आणि 15 आरसीबीने जिंकले आहेत. म्हणजे स्पर्धा एक प्रकारे बरोबरीची आहे.