Punjab Kings vs Royal Challengers Bengaluru, Playing 11 Update : आज आयपीएल 2024 मध्ये, रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि पंजाब किंग्ज यांच्यात सामना होणार आहे. हा सामना दोन्ही संघांसाठी करा किंवा मरो असा होणार आहे. सामन्यास थोड्याच वेळात म्हणजे संध्याकाळी 7.30 वाजता सुरूवात होईल. वास्तविक, आज जो संघ पराभूत होईल तो प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडेल. अशा स्थितीत दोन्ही संघ विजयासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतील.
तत्पूर्वी झालेला नाणेफकीच्या कौल (Toss Update) पंजाब किंग्ज संघाच्या बाजूनं लागला आहे. पंजाबचा कर्णधार सॅम करन याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. पंजाबचा कर्णधार सॅम करनने प्लेइंग-11 मध्ये दोन बदल केले आहेत. कागिसो रबाडाच्या जागी लियाम लिव्हिंगस्टोनचा प्लेईंग-11 मध्ये समावेश करण्यात आला आहे. त्याचवेळी बेंगळुरूचा कर्णधार फाफ डुप्लेसिसनेही प्लेइंग-11 मध्ये बदल केला. मॅक्सवेलच्या जागी लोकी फर्ग्युसनचा प्लेइंग-11 मध्ये समावेश करण्यात आला आहे.
It’s toss time in Dharamsala 🏔️
Sam Curran wins the toss and Punjab Kings will be bowling first 🪙#PBKSvRCB #TATAIPL #IPLonJioCinema pic.twitter.com/fVGVhm5DgM
— JioCinema (@JioCinema) May 9, 2024
PBKS vs RCB : दोन्ही संघांची प्लेइंग 11 खालीलप्रमाणे…
पंजाब किंग्स : जॉनी बेअरस्टो (विकेटकीपर), प्रभसिमरन सिंग, रिले रौसो, शशांक सिंग, सॅम कुरन (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, आशुतोष शर्मा, हर्षल पटेल, राहुल चहर, अर्शदीप सिंग, विद्वत कावेरप्पा. ( इम्पॅक्ट सब : हरप्रीत ब्रार, तनय थियागराजन, ऋषी धवन, जितेश शर्मा, नॅथन एलिस)
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू : विराट कोहली, फाफ डुप्लेसिस (कर्णधार), विल जॅक, रजत पाटीदार, महिपाल लोमरोर, कॅमेरून ग्रीन, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), स्वप्नील सिंग, कर्ण शर्मा, मोहम्मद सिराज, लॉकी फर्ग्युसन. ( इम्पॅक्ट सब: अनुज रावत, सुयश प्रभुदेसाई, विजयकुमार विशाक, यश दयाल, मयंक डागर)
दरम्यान, आरसीबीचे 11 सामन्यात 8 गुण आहेत आणि जर आरसीबीने तिन्ही सामने जिंकले तर प्लेऑफमध्ये पोहोचण्याची शक्यता वाढेल. पंजाब किंग्जचीही तीच अवस्था आहे. पंजाबही आठव्या स्थानावर आहे. त्याचे देखील 8 अंक आहेत. मात्र, या दोन संघांपैकी एकालाच 14 गुणांचा टप्पा गाठता येणार आहे.
मुंबई इंडियन्सचा संघ बुधवारी प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला. त्याच वेळी, आता एलिमिनेशनचा टप्पा सुरू झाला आहे. आजच्या सामन्यात पराभूत होणारा संघही बाहेर पडेल. पराभूत संघाचे 12 सामन्यांतून आठ गुण असतील आणि ते जास्तीत जास्त 12 गुणांपर्यंत पोहोचण्यास सक्षम असतील, जे प्लेऑफसाठी पात्र ठरण्यासाठी पुरेसे नसतील. विजेत्या संघाच्या आशा जिवंत राहतील. मात्र, त्याला इतर संघांच्या निकालावरही अवलंबून राहावे लागणार आहे.
आयपीएलमध्ये पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात 32 सामने खेळले गेले आहेत. यापैकी 17 पंजाबने आणि 15 आरसीबीने जिंकले आहेत. म्हणजे स्पर्धा एक प्रकारे बरोबरीची आहे.