Rupali Chakankar : देशासह राज्यात आगामी लोकसभा निवडणुकीचे वारे वाहताना दिसत आहे. प्रत्येक पण आपापल्या परीने प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे. त्यातच राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटाकडून जागा वाटपावरून रस्सीखेच सुरु असल्याचे दिसून येत आहे.कारण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खासदार अमोल कोल्हे यांना निवडून आणण्यासाठी वळसे पाटील यांच्यासह आपण दिवसरात्र एक केला असल्याचे म्हटले होते. दरम्यान आज अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी अजित पवार यांच्या वक्तव्यावर आपली प्रतिक्रिया देत ‘सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे अजितदादांमुळेच खासदार झाल्याचा दावा केला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्यावर रुपाली चाकणकर यांनी आज प्रतिक्रिया दिली आहे. याविषयी बोलताना,”दादांवर बोलणारे दोन्ही खासदार दादांमुळे निवडून आले आहेत. सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे अजितदादांमुळेच खासदार झाले आहेत. दादा सोबत नाही म्हणून तळ ठोकावा लागत आहे. सुप्रीया सुळे गेली 15 वर्ष अजितदादांमुळे निवडून आल्या आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये अजित पवार राष्ट्रवादी गट आणि महायुतीचा उमेदवार निवडून येईल.” असा विश्वास यावेळी चाकणकरांनी व्यक्त केला.
उपमुख्यमंत्री अजित पवार लवकरच मुख्यमंत्री होतील असा दावा केला आहे. आता चर्चांना राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या रुपाली चाकणकर यांनी केलेल्या वक्तव्यामुळे पुन्हा उधाण आले आहे. अजित पवार मुख्यमंत्री व्हावे ही आमची इच्छा आहे, असे वक्तव्य रुपाली चाकणकर यांन केले आहे. अजित दादांना मुख्यमंत्री होताना पाहायचं असेल तर आम्हला काम करावं लागेल. आमचं स्वप्न आहे त्यासाठी आम्ही प्रयत्न करू दादा मुख्यमंत्री व्हावं हे सर्वांची इच्छा आहे, असेही रुपाली चाकणकर म्हणाल्या.
पुढे बोलताना रुपाली चाकणकर म्हणाल्या, “अजित पवारांनी 2023 ला निर्णय घेतला तो विकासासाठी घेतला आहे. अनेक चांगले निर्णय घेतले अजित पवारांनी घेतले आहे. 18 जानेवारीला मुबंईत महिला मेळावा आयोजित केला आहे. तृतीयपंथीयासाठी ससूनमध्ये स्वतंत्र वॉर्ड करणार आहे. भावनिक राजकारण जास्त वेळ चालत नाही. येणाऱ्या लोकसभा- विधानसभा निवडणुकांमध्ये महायुतीचा विजय होणार आहे. प्रत्येकाची लढण्याची इच्छा असते,स्पर्धक असतात त्यामुळे खडकवासलामध्ये अनेक इच्छुक आहेत.” असेही त्यांनी यावेळी म्हटले.