Google Map : नव्या वर्षात गुगल मॅप्समध्ये काही बदल करण्यात येणार आहे. जर तुम्ही गुगल मॅपचा मोठ्या प्रमाणावर वापर करत असाल तर तुम्ही ही बातमी जरूर वाचा, कारण गुगल आपल्या मॅपचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य कायमचे बंद करणार आहे. गुगल मॅपचे असिस्टंट ड्रायव्हिंग मोड फीचर 2020 मध्ये लॉन्च करण्यात आले होते. मात्र Google फेब्रुवारी 2024 नंतर हे फीचर बंद करणार आहे.
गुगल मॅपला लवकरच एक नवीन इंटरफेस मिळणार आहे. गुगल मॅप असिस्टेंड ड्रायव्हिंग मोड फिचरमध्ये मीडिया क्लिप्स, मॅप्सची माहिती आणि स्ट्रिमिंग अॅपची माहिती मिळत होती. मात्र, आता हे फिचर अॅपल प्लेप्रमाणे काम करेल. त्यामुळे यूजर्सना Google Map मध्ये एक नवीन इंटरफेस मिळेल जो असिस्टंट ड्रायव्हिंग मोड फीचरला रिप्लेस करेल. गुगल मॅपचे हे वैशिष्ट्य विशेषतः ज्यांच्याकडे कार आहे त्यांच्यासाठी होती.
गुगल मॅप असिस्टंट ड्रायव्हिंग मोड फीचरमुळे फोनमध्ये एक डॅशबोर्ड मिळते. यामध्ये मीडिया सजेशन, ऑडिओ कंट्रोल आणि मॅप यांसारखी फीचर्स असतात. हे फीचर्स बंद केल्याने असिस्टेड ड्रायव्हिंग मोड Android Auto ने बदलता येईल. Android Auto हे गुगलचेच एक उत्पादन आहे, जे कार चालविण्यासाठी डिझाईन केले गेले आहे. हे अँड्रॉइड मोबाइलला कारच्या एंटरटेन्मेंट बोर्डशी कनेक्ट करण्याची सुविधा उपलब्ध करून देते.
हे फीचर बंद केल्यानंतरही वापरकर्ते ड्रायव्हिंग मोडचा इतर मार्गांनी वापर करू शकतील. यासाठी त्यांना गुगल अॅप किंवा गुगल मॅप्सवर जाऊन Hey Google चा व्हॉईस कमांड द्यावा लागेल, ड्रायव्हिंग मोड लाँच करावा लागेल. हे वैशिष्ट्य तुम्हाला Google असिस्टन्स ड्रायव्हिंग मोड सारखे मार्ग देखील दर्शवेल.
फ्यूल सेव्हिंग फिचर
गुगल मॅपमध्ये फ्यूल सेव्हिंग फिचरदेखील अॅड करण्यात आले आहे. वाहनाने प्रवास करणाऱ्यांसाठी गुगल मॅप्सचे इंधन बचतीचे फिचर सर्वात उपयोगाचं ठरणार आहे. त्या मार्गावर किती ट्रॅफिक असेल आणि किती पेट्रोल लागेल याचाही अंदाज सांगितला जातो. हे फिचर आतापर्यंत मोजक्याच देशांमध्ये उपलब्ध होते आणि आता लवकरच भारतीय युजर्ससाठी हे फिचर अॅपमध्ये अॅड करण्यात येणार आहे.