Rohit Pawar – बारामती अँग्रोमध्ये कथित गैरव्यावहार प्रकरणी मुंबईसह सहा ठिकाणी ईडीने छापेमारी केली होती. त्या नंतर ईडीच्या वतीने राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांना नोटीस पाठवण्यात आली होती. त्यानुसार रोहित पवार यांना आज बुधवारी ईडी कार्यालयात दाखल झाले आहे.
मिळलेल्या माहितीनुसार, बारामती ॲग्रो कारखाना प्रकरणी आज रोहित पवार यांची ईडी चौकशी करणार आहे. आज सकाळी रोहित पवार हॉटेल ट्रायडेंट मधून विधिमंडळात गेले आणि तेथे थोर पुरुषांच्या फोटोला अभिवादन केले. त्यानंतर ते राष्ट्रवादीच्या कार्यालयात पोहोचले. तेथे त्यांनी शरद पवार, सुप्रिया सुळे यांची तसेच अनेक कार्यकर्त्यांची भेट घेतली.
या दरम्यान रोहित पवार यांनी मोठ्या शक्तिप्रदर्शनाची तयारी केली आहे. रोहित पवार यांच्या सोबत खासदार सुप्रिया सुळे देखील उपस्थित आहे. तसेच रोहित पवार यांची चौकशी संपेपर्यंत शरद पवार दिवसभर पक्षाच्या कार्यालयातच थांबणार आहेत.