Success Story : गेल्या काही वर्षांत सरकारने देशात सौरऊर्जेला मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन दिले आहे. रामलल्लाच्या प्राण प्रतिष्ठेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांसाठी ‘सूर्योदय योजना’ सुरू केली, ज्याअंतर्गत एक कोटी घरांवर सौर पॅनेल बसवण्यात येणार आहेत. हे प्रयत्न यशस्वी करण्यासाठी अनेक खाजगी आणि सरकारी कंपन्या सरकारला सहकार्य करत आहेत. आजच्या Success Story च्या भागात अशाच एका कंपनीचा प्रेरणादायी प्रवासाविषयी माहिती देणार आहोत.
ही गोष्ट आहे कर्नाटकच्या स्वदेशी ग्रुपची, ज्याची किंमत सध्या 100 कोटी रुपये आहे. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की ही कंपनी एका शेतकऱ्याचा मुलगा प्रवीण याने सुरू केली आहे, जो एकेकाळी गावात रोज 6 रुपये घेऊन मजूर काम करायचा. ही कंपनी सुद्धा अवघ्या 1800 रुपयांपासून सुरू झाली आणि आपल्या मेहनतीच्या जोरावर प्रवीण यांनी कंपनीला यश मिळवून दिले.
प्रवीणचा जन्म कर्नाटकातील दावणगेरे शहरातील देवरा होनाली गावात झाला. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या प्रवीणला कधीही कोणत्याही सुविधा मिळाल्या नाहीत. त्याचं गाव इतकं मागासलेलं होतं की, तिथे ना नियमित वीज होती ना 8वीच्या पुढे कोणतीही शाळा. मात्र प्रवीणने अभ्यास सोडला नाही. प्रवीणने त्याच्या गावापासून सुमारे 7 किलोमीटर दूर असलेल्या शाळेत प्रवेश घेतला. शिक्षणासाठी प्रवीण दररोज 14 किलोमीटरपर्यंतचा पायी प्रवास करून शाळेत जायचे.
रोजच्या या अडथळ्यांना पार करत प्रवीण यांनी आपली दहावीची परीक्षा पूर्ण केली. दहावी उत्तीर्ण झालेला आपल्या गावातील पहिला मुलगा म्हणून प्रवीण याना ओळखले जात होते. प्रवीण यांची आर्थिक परिस्थिती तशी बेताची होती, त्यामुळे प्रवीणनेही आई-वडिलांसोबत शेतात मजूर म्हणून काम केले. मजुरीच्या मोबदल्यात त्याकाळी प्रवीण याना दररोज सहा रुपये मिळत. पण प्रवीणने चांगल्या भविष्याची स्वप्ने पाहणे थांबवले नाही आणि त्याच्या इच्छेने त्याला दावणगेरे शहरात आणले. याठिकाणी त्यांनी त्यांचे पदवीचे शिक्षण पूर्ण केले. अभ्यासासोबतच त्यांनी या दरम्यान पार्टटाइम नोकरी केली आणि आपली आर्थिक बाजू सांभाळून ठेवली.
कंपनीत सेल्समनची नोकरी
2006 मध्ये ग्रॅज्युएशन केल्यानंतर प्रवीणच्या कॉर्पोरेट करिअरची सुरुवात पार्ले कंपनीतून झाली. तेव्हापासून त्यांनी कोका-कोला, विप्रो आणि ओयो सारख्या प्रसिद्ध कंपन्यांमध्ये 15 वर्षे काम केले. ते विक्री विभागात काम करायचे, त्यामुळे त्यांना या क्षेत्रात नैपुण्य मिळाले. OYO मध्ये काम करत असताना, त्याचे संस्थापक रितेश अग्रवाल यांच्या विचाराने ते प्रभावित झाले आणि पहिल्यांदाच त्यांना वाटले की आपणही एक स्टार्टअप सुरु करू शकतो.
करोनामुळे नोकरी गेली अन् कंपनीचा पाया रचला
असा विचार सुरु असतानाच जगभरात करोनाच्या महामारीचे सावट पसरले. आणि याच काळात प्रवीण यांची नोकरी गेली, तेव्हा त्याने ठरवले की स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा. 2020 च्या सुरुवातीला प्रवीणने कामाला सुरुवात केली आणि दोन वर्षे फक्त आपल्या व्यवसायावर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी म्हैसूरमध्ये ‘स्वदेशी ग्रुप’ या नावाने अक्षय ऊर्जा क्षेत्रात स्वत:चा व्यवसाय सुरू केला. त्याच्याकडे गुंतवणुकीसाठी जास्त पैसे नव्हते. त्यांनी कंपनीच्या नोंदणीसाठी 1800 रुपये वापरले आणि त्यानंतर कर्नाटकातील टियर 2-3 शहरांमध्ये सोलर वॉटर हीटर्स विकायला सुरुवात केली.
अनोखी कल्पना कामी आली
प्रवीणने पत्नी चिन्मयीच्या मदतीने आपले काम सुरू केले. सुरुवातीला तो उधारीवर सोलर वॉटर हीटर्स खरेदी करत असे आणि ते विकल्यानंतर त्याच्या उत्पादकाला पैसे देत असे. जेव्हा तो सोलर वॉटर हीटर्स विकायचा तेव्हा अनेक ग्राहकांनी इतर घरगुती उपकरणे जसे की वॉटर प्युरिफायर इत्यादींबद्दल विचारले. तेव्हा प्रवीणला कल्पना आली की तो आपली उत्पादने बनवू शकतो आणि विकू शकतो पण त्याला निधीची गरज आहे.
आर्थिक पाठबळ मिळाले
त्याने आपली व्यावसायिक कल्पना त्याच्या निर्मात्याला सांगितली आणि त्याला यशाची हमी दिली. तिथून प्रवीणला 10 लाख रुपये मिळाले, ज्याचा वापर त्याने एक शोरूम सुरू केला जिथे सौर उर्जेवर चालणारी विविध उत्पादने जसे की, सोलर वॉटर हीटर्स, इन्व्हर्टर, बॅटरी, वॉटर प्युरिफायर, स्वयंचलित वॉटर लेव्हल कंट्रोलर, एअर हीट पंप आणि इतर अनेक गोष्टी प्रदर्शित केल्या गेल्या.
दोन वर्षांत ‘स्वदेशी समूहा’ला यश मिळू लागले. त्याने पहिल्या वर्षीच आपली पहिली फ्रँचायझी सुरू केली. ‘स्वदेशी ग्रुप’ने संपूर्ण कर्नाटकात 15 शोरूम उघडल्या आहेत, त्यापैकी चार कंपनीच्या मालकीचे आहेत आणि बाकीचे फ्रँचायझी आहेत. कंपनी B2B आणि B2C दोन्हीमध्ये काम करते. आज त्यांची कंपनी अनेकांना रोजगार देत आहे. योग्य दिशेने मेहनत केली तर काहीही साध्य करता येते हेच प्रवीण यांच्या यशावरून सिद्ध होते.