Supriya Sule Letter | Central Election Commission | Lok Sabha Election : संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात अखेरच्या दिवशी प्रचाराचा धुराळा उडाला. प्रचाराच्या सांगता सभेत आरोप प्रत्यारोपाबरोबरच भावनिक किनार देखील पाहायला मिळाली. बारामतीत पहिल्यांदाच पवार विरुद्ध पवार रिंगणात उतरल्याने टोकाचा प्रचार झाला.
महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्यासाठी अजित पवार, तर महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्यासाठी शरद पवार यांची बारामतीत सांगता सभा जोरदार रंगली. भाषणादरम्यान रोहित पवार भावूक झाले. शरद पवार यांच्याविषयी बोलताना त्यांना अश्रू अनावर झाले. तर अजित पवार यांनी ही चौफेर टोलीबाजी करीत रोहित पवार यांच्या रडण्याच्या नक्कल केली.
उद्या ७ मे रोजी लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. या तिसऱ्या टप्प्यात ११ जागांवर मतदान पार पडणार आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातील ३०० बूथपैकी १५३ बूथ संवेदनशील आहेत. यासंदर्भात सुप्रिया सुळे यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र लिहिले आहे.
आपल्या बारामती येथे आदरणीय पवार साहेबांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित सांगता प्रचारसभेला उपस्थित राहिले. याप्रसंगी मला सातत्याने तीन वेळा निवडून दिल्याबद्दल जनतेचे आभार मानले. या सभेला माजी गृहमंत्री अनिलजी देशमुख, सुनीलजी केदार, शिरुर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार व… pic.twitter.com/3f4pS88ps1
— Supriya Sule (@supriya_sule) May 5, 2024
बारामती व खडकवासला आणि दौंड व इंदापूर विधानसभा मतदारसंघ हे संवेदनशील म्हणून जाहीर करावे. या दोन्ही मतदारसंघातून मिळत असलेल्या माहितीनुसार मोठ्या प्रमाणात गैरप्रकार होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे या मतदारसंघात कोणताही गैर किंवा अनुसूचित प्रकार घडल्यास सर्वसामान्य नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावं लागेल, त्यामुळे योग्य बंदोबस्त आणि गैरप्रकार रोखण्याची यंत्रणा लावा, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पत्राद्वारे केली आहे.