T20 World Cup 2024, Team Uganda Squad : टी20 विश्वचषक 2024 स्पर्धा ही 1 जूनपासून सुरू होणार आहे. यावेळचा विश्वचषक अमेरिका आणि कॅरेबियन देशांमध्ये संयुक्तरित्या होणार आहे. भारत, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेसह अनेक देशांनी 2024 च्या T20 विश्वचषकासाठी त्यांचे संघ जाहीर केले आहेत. आता युगांडाने विश्वचषकासाठी 15 खेळाडूंचा संघ जाहीर केला आहे.
T20 World Cup 2024 : टी-20 विश्वचषकादरम्यान दहशतवादी हल्ल्याचा धोका..! पाकिस्तानातून मिळाली धमकी
टी-20 विश्वचषकासाठी युगांडाचा संघ पहिल्यांदाच मैदानात उतरणार आहे. ब्रायन मसाबाकडे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे, तर रियाजत अली शाहला उपकर्णधारपद देण्यात आले आहे.
📢 Squad Unveiled! 🏏 Uganda’s finest cricketers are geared up for the T20 World Cup in the West Indies & USA! 🌟🏆 Let’s cheer loud for the Cricket Cranes as they take flight! 🇺🇬👏 #T20WC #UgandaProud #WeAreCricketCranes pic.twitter.com/Wg3QXXBz3J
— Uganda Cricket Association (@CricketUganda) May 6, 2024
युगांडाचा T20 विश्वचषक संघ : ब्रायन मसाबा (कर्णधार), साइमन सेसाजी, रोजर मुकासा, कॉस्मस क्येवुटा, दिनेश नकरानी, फ्रेड अकेलम, कैनेथ वैस्वा, अलपेश रमजानी, फ्रैंक न्सुबुगा, हेनरी सेन्योंडो, बिलाल हसन, रॉबिन्सन ओबुया, रियाजत अली शाह (उपकर्णधार), जुमा मियाजी, रोनक पटेल.