Air Force Soldier – पंजाबातील कॉंग्रेस नेते व माजी मुख्यमंत्री चरणजीतसिंग चन्नी यांच्या पाठोपाठ आरजेडी नेते तेज प्रताप यादव यांनी हवाईदलाच्या वाहनावर जम्मू काश्मीरात पुंछ जिल्ह्यात झालेल्या हल्ल्यामागे निवडणुकीचे राजकारण असल्याचा आरोप केला आहे. या हल्ल्यात एक जवान शहीद तर अन्य चार जण जखमी झाले आहेत.
पत्रकारांशी बोलताना तेज प्रताप यादव म्हणाले, “शहीद किनके वजाह से हुए? मोदी जी की वजाह से हुए. पहले कहां कोई शहीद होता था? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. चरणजीत चन्नी यांनीही हा हल्ला म्हणजे निवडणुकीसाठीची पुर्वनियोजित स्टंटबाजी होती असे म्हटले होते.
यामुळे आता या विषयावर निवडणूक प्रचारात मोठे वादंग होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भारतीय जनता पक्षाने मात्र हे आरोप फेटाळून लावले आहेत. कॉंग्रेस नेते नेहमीच आमच्या जवानांच्या बलिदानाचा अवमान करीत असतात असे कॉंग्रेसचे म्हणणे आहे.