IPL 2024 (PBKS vs CSK Match 53) : चेन्नई सुपर किंग्जचा (CSK) माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यात नवव्या क्रमांकावर फलंदाजीला आला. टी-20 कारकिर्दीतील ही पहिलीच वेळ होती जेव्हा माही इतक्या खालच्या क्रमांकावर फलंदाजीला उतरला. या सामन्यात धोनी खाते न उघडताच बाद झाला आणि त्याला पंजाबचा वेगवान गोलंदाज हर्षल पटेलने त्रिफळाचीत केले. याबाबत माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणने आपले मत व्यक्त केले आणि म्हटले आहे की, “धोनीने जबाबदारी स्वीकारून वरच्या फळीत फलंदाजीसाठी यावे. दीर्घकाळाचा विचार करता, सीएसकेने प्लेऑफमध्ये प्रवेश केला, तर त्यांना या स्ट्रॅटजीचा फायदा होणार नाही” असं इरफान म्हणाला.
धोनीने किमान चार-पाच षटके खेळावीत…
पठाणने एका स्पोर्ट्स चॅनलवर मत व्यक्त केले की, धोनी नवव्या क्रमांकावर फलंदाजीला येण्याचा सीएसकेला काहीही उपयोग होणार नाही. मला माहित आहे की, तो 42 वर्षांचा आहे, पण तो जबरदस्त फॉर्मात आहे. त्याने जबाबदारी घेतली पाहिजे आणि वरच्या फळीत फलंदाजीसाठी यायला पाहिजे. धोनीने किमान चार-पाच षटके फलंदाजी करायला हवी. तो शेवटच्या किंवा शेवटच्या दोन षटकांत फलंदाजीला येत आहे . दीर्घकाळाचा विचार करता चेन्नईसाठी हे फायदेशीर ठरणार नाही.
धोनी या मोसमात दिसतोय जबरदस्त फॉर्मात…
धोनीने IPL 2024 च्या चालू हंगामात बॅटने चांगली कामगिरी केली आहे. त्याने सात डावात 224.49 च्या स्ट्राईक रेटने आणि 55 च्या सरासरीने 110 धावा केल्या आहेत. पठाण पुढे म्हणाला की, “चेन्नई येथून प्लेआॅफसाठी पात्र ठरण्याची शक्यता आहे. यासाठी संघाला 90 टक्के सामने जिंकावे लागतील. फॉर्ममध्ये असलेल्या वरिष्ठ खेळाडूने वरच्या क्रमांकावर फलंदाजीला उतरायलाच पाहिजे. मागील काही काळापासून तो जे काही करत आहे. ते तो प्रत्येक वेळेस करू शकत नाही. तसं करुन आता चालणार नाही.
“संघाला त्याची गरज असताना धोनीने मुंबईविरुद्ध प्रभाव पाडला. तुम्ही शार्दुल ठाकूरला तुमच्या पुढे फलंदाजीला पाठवू शकत नाही. आम्ही धोनीला नवव्या क्रमांकावर फलंदाजी करताना पाहू शकत नाही. समीर रिझवीनेही 15व्या षटकात पॅड घातले होते. या संघाने यावर काम करणे आवश्यक आहे आणि कोणीतरी धोनीला चार षटके फलंदाजी करण्यास सांगितले पाहिजे.
धोनीनं मुंबईविरोधात नक्कीच आपल्या खेळीने प्रभाव पाडला होता. पण येथे जेव्हा जेव्हा संघाला गरज होती, तेव्हा शार्दूल ठाकूरला आपल्या आधी पाठवू शकत नाही. तुम्ही धोनीला नवव्या क्रमांकावर फलंदाजी करताना पाहू शकत नाही. 15 व्या ओव्हरला समीर रिझवीदेखील फलंदाजीसाठी तयार होता. कम ऑन यार, किमान 4 षटक तरी खेळ..!” असं इरफानने म्हटले आहे. संघाने यावर काम करणे आवश्यक आहे आणि किमान चार षटके तरी फलंदाजी कर, असे कोणीतरी धोनीला सांगण्याची गरज आहे, हे देखील इरफान म्हणाला.
हरभजननेही व्यक्त केला संताप….
रविवारी झालेल्या पंजाब किंग्स विरुद्धच्या सामन्यात धोनी करिअरमध्ये पहिल्यांदा 9 व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला. यावर इरफाननंतर आता टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू हरभजन सिंगने सुद्धा संताप व्यक्त केला. “धोनीला खालच्या क्रमांकावर फलंदाजीला यायच असेल, तर त्याला संघामधून ड्रॉप केलेलंच चांगलं” असं मत हरभजन याने स्पष्ट शब्दांत मांडले आहे.