नगर -जिल्हा प्राथमिक शिक्षक बॅंक निवडणुकीसाठी रिंगणात उतरावे अशी मागणी अनेक शिक्षक सभासदांनी आपणाकडे केली आहे. त्यानुसार पदवीधर महासंघाच्या पदाधिकाऱ्यांशी आणि इतर काही प्रमुख नेत्यांसोबत झालेल्या चर्चेनुसार स्वतंत्र पॅनल स्थापन करणार असल्याचे, पदवीधर महासंघाचे राज्य सरचिटणीस महेश डोईफोडे यांनी सांगितले.
सामान्य सभासदांना विश्वासात घेऊन सभासदा भिमुख कारभार करण्यासाठी सभासदांच्या मागणीनुसार पॅनल स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. बॅंकेचा कारभार सभासदांचे हित डोळ्यासमोर ठेवून काम करण्याची इच्छा असणारे इतरही काही शिक्षक नेत्यांना सोबत घेऊन पॅनलचे नाव जाहीर करणार आहोत.
पदवीधर महासंघाचे जिल्हा अध्यक्ष अविनाश गांगर्डे, केंद्रप्रमुख संघाचे जिल्हा अध्यक्ष संभाजीराव पवार, बबनराव कुलट, सरचिटणीस दगडू महांडुळे, गोरक्षनाथ दातीर, जिल्हाकोषाध्यक्ष बाळासाहेब दातीर, जिल्हा कार्याध्यक्ष भास्करराव हिंगडे, संतोष शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष तुषार दळवी, संघटक संदीप हिरवे, संजय रामफळे, नवीन वागजकर, प्रीतम गुरव, ज्ञानदेव मोरे, कुशाबा पलाटे, लहू भामरे, विठ्ठलराव भानगुडे, अनिल शिरसाठ, अंबादास कांबळे, सोमाजी मधे, गणेश ठोंबरे, कैलास सदामत, जयदत्त चव्हाण, उमेश काकडे, लक्ष्मण टेकाळे, गौतम गायकवाड, ज्योती नेटके, मनीषा मिसाळ, सीमा डोईफोडे, सिंधुताई देवकर, ज्योती खंडागळे, मनीषा गुरव आदींनी कळविले आहे.