नवी दिल्ली – कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या नेतृत्वात देशभरातील विरोधी पक्षाच्या सात मुख्यमंत्र्यांची व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक झाली. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कॅबिनेट बैठक असल्यामुळे आधी बोलू द्या, अशी विनंती सोनिया गांधी यांनी केली. उद्धव यांनी प्रांजळपणे ममतादीदींना परवानगी मागितली असता, उद्धवजी आप बहुत अच्छा फाईट कर रहे है, अशी स्तुतिसुमने त्यांनी उधळली. तेव्हा उद्धव ठाकरे “लढनेवाले बाप का लढनेवाला बेटा हूं’, असे अभिमानाने म्हणाले होते. या पार्श्वभूमीवर आमदार नितेश राणे यांनी टीका केली आहे.
डरने वाले बाप का, डरा हुआ बेटा हूं, असे म्हणत नितेश राणे यांनी शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. याआधीही अभिनेता सुशांतसिंह राजपुतच्या मृत्यू प्रकरणावरून नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे आणि शिवसेना यांच्यावर टीका केली आहे. टीका करत असताना त्यांनी रिया चक्रवर्तीला आदित्य ठाकरेंचे नाव का घ्यावसे वाटले, असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला होता.
डरने वाले बाप का,
डरा हुआ बेटा हूं !!
-Baby Penguin— nitesh rane (@NiteshNRane) August 27, 2020
दरम्यान, जीएसटी येणार नाही तर आम्ही काय करणार? एक-एक गोष्ट केंद्र सरकार बंद करत आहे. आम्ही काय केंद्राला भीक मागत नाही. जनतेने सर्वांना निवडून दिले आहे. सगळ्यांनी एकत्र येऊन बोलायला हवे. संकटाच्या काळात आधी एकत्र यायला हवे, असे मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या बैठकीत मांडले. तसेच केंद्र सरकारशी लढायचे की घाबरून बसायचे, हे आपण ठरवायला हवे, अशीही भूमिका त्यांनी मांडली. मानाने म्हणाले.