IPL 2024 (MI vs KKR Match 51) : मुंबईची आज कोलकाताशी टक्कर, सलग 3 पराभवानंतर हार्दिकची सेना पुनरागमन करणार का? प्लेऑफवर टांगती तलवार…

IPL 2024 (Mumbai Indians vs Kolkata Knight Riders, Match 51) :- आयपीएल 2024 चा 51 वा सामना मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. हा सामना शुक्रवारी (3 मे) संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून खेळवला जाईल. आयपीएल 2024 मध्ये कोलकाता नाइट रायडर्सची आतापर्यंतची कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील KKR ने आतापर्यंत 9 पैकी 6 सामने जिंकले असून त्यांचे 12 गुण आहेत. KKR सध्या IPL 2024 च्या गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे.
दुसरीकडे, पाच वेळा चॅम्पियन मुंबई इंडियन्सची अवस्था वाईट आहे. सलग तीन सामने हरले असून त्याच्या प्लेऑफच्या आशा जवळपास संपल्या आहेत. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सने आतापर्यंत खेळल्या गेलेल्या 10 पैकी फक्त तीन सामने जिंकले आहेत आणि 7 गमावले आहेत. गुणतालिकेत संघ 9व्या स्थानावर आहे. त्याखाली फक्त रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आहे. मुंबईला लखनौ सुपर जायंट्स, दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या मागील तीन सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे.
आता मुंबईचे चार सामने बाकी आहेत. जर संघाला प्लेऑफमध्ये जाण्याची थोडीशी आशाही कायम ठेवायची असेल तर त्याला सर्व सामने जिंकावे लागतील. त्याचवेळी केकेआरने त्यांच्या शेवटच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा पराभव केला होता. अशा स्थितीत केकेआरचे मनोबल उंचावलेले आहे. या संघाची नजर प्लेऑफवर असेल. अशा स्थितीत केकेआरलाही हा सामना कोणत्याही किंमतीत जिंकायचा आहे.
IPL 2024 : पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर CSK प्लेऑफमध्ये कशी पोहोचणार? जाणून घ्या, संपूर्ण समीकरण…
हेड-टू-हेड रिकाॅर्ड….
आयपीएलच्या इतिहासात कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडिया 32 सामन्यांमध्ये आमनेसामने आले. यापैकी कोलकाताने 9 तर मुंबईने 23 जिंकले आहेत. म्हणजे हेड टू हेड मध्ये मुंबईचा संघ खूप पुढे आहे.
गोलंदाजीत केकेआरची कमजोरी….
या हंगामात केकेआरची सर्वात मोठी कमजोरी म्हणजे त्याची गोलंदाजी. आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा गोलंदाज मिचेल स्टार्कला त्याच्या किंमतीनुसार कामगिरी करता आली नाही. हर्षित राणावरील एका सामन्याची बंदी केकेआरची गोलंदाजी आणखी कमकुवत करेल.
मुंबईची कमजोरी म्हणजे त्याची फलंदाजी…
मुंबई इंडियन्सच्या यंदाच्या हंगामातील खराब कामगिरीचे सर्वात मोठे कारण म्हणजे संघाची फलंदाजी. संपूर्ण मोसमात रोहित शर्मा आणि तिलक वर्मा वगळता अन्य कोणत्याही फलंदाजाच्या कामगिरीत सातत्य राहिले नाही. या कारणामुळे संघाला सतत पराभवाला सामोरे जावे लागले. जसप्रीत बुमराह आणि गेराल्ड कोएत्झी यांनी गोलंदाजीत खूप चांगली कामगिरी केली. पण, फलंदाजांच्या खराब कामगिरीमुळे पाचवेळा चॅम्पियन संघाची अवस्था वाईट झाली आहे.





