नगर -पावसामुळे नगर तालुक्यातील अनेक रस्त्यांची मोठी दुरवस्था झाली असून, रस्त्यावरील खड्डे लहान-मोठ्या अपघातांना कारणीभूत ठरत आहे. तातडीने रस्त्यांची डांबराने पॅचिंग करण्याच्या मागणीसाठी नगर तालुका राष्ट्रवादीच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात नगर तालुकाध्यक्ष गहिनीनाथ दरेकर, गजानन भांडवलकर, अक्षय भिंगारदिवे, वैभव म्हस्के, विशाल म्हस्के, विकास झरेकर, मनोज औशिकर, प्रितेश दरेकर, गणेश दरेकर, वैभव शेवाळे, दादा शिंदे, दत्तात्रय बोठे आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते. रस्त्यांवरील खड्डयांची पॅचिंग डांबराने करण्याची मागणी नगर तालुका राष्ट्रवादीच्या वतीने करण्यात आली आहे.
सदर मागणीचे निवेदन कार्यकारी अभियंता संजय पवार यांना देण्यात आले. पवार यांनी आंदोलकांना शासनाला मंजुरीसाठी पॅचिंगचे प्रस्ताव पाठविण्यात आले असून, एक महिन्याची सदर कामाची प्रक्रिया पुर्ण करुन खड्डयांचे डांबराने पॅचिंगचे काम सुरु करण्याचे लेखी आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.