मुंबई – विधानसभा निवडणुकांपूर्वी जोरदार ‘आउट गोईंग’ झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मागील काही दिवसांपासून ‘इनकमिंग’ सुरु झाल्याचं पाहायला मिळतंय. भाजपचे बडे नेते असलेल्या एकनाथ खडसे यांनी काही दिवसांपूर्वीच हातावर घड्याळ बांधलं असून त्यांच्यापाठोपाठ त्यांचे समर्थकही राष्ट्रवादीत सामील होत आहेत. अशातच आता वंचित बहुजन आघाडीतील काही कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे.
वंचित बहुजन आघाडीतील कार्यकर्त्यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाबाबत पक्षाच्या अधिकृत ट्विटर खात्यावर “वंचित बहुजन आघाडीतील गणेश जाधव, सुधीर आंब्रे, ज्योती कांबळे, प्रकाश यादव, दीपक तांबे, रेखा मोरे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. पक्षाच्या सामाजिक न्याय विभागात ते कार्य करणार आहेत.” अशी माहिती देण्यात आली आहे.
पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला आहे.
वंचित बहुजन आघाडीतील गणेश जाधव, सुधीर आंब्रे, ज्योती कांबळे, प्रकाश यादव, दीपक तांबे, रेखा मोरे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी आज खा. @supriya_sule यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. पक्षाच्या सामाजिक न्याय विभागात ते कार्य करणार आहेत.#NCP #पक्षप्रवेश pic.twitter.com/d3s9YqN3km
— NCP (@NCPspeaks) November 3, 2020