भरसभेत बिहारच्या मुख्यमंत्र्यांवर कांदा फेकल्याने खळबळ; नितीश कुमार म्हणाले…

पटना – बिहार निवडणुकीचे दुसऱ्या टप्प्यातील मतदान सुरू आहे. यावेळी नितीश कुमार तिसऱ्या टप्प्यातील निवडणुक प्रचारासाठी मधुबनी येथील हरलाखी येथे पोहोचले होते. नोकरीच्या विषयावर बोलत असताना गर्दीतून एकाने त्यांच्या दिशेने कांदा फेकला. त्यावर नितीश कुमार यांनी संताप व्यक्त करत फेका, अजून फेका, फेकत रहा असे म्हणाले.

घटनेनंतर सुरक्षा यंत्रना सतर्क झाली आहे. त्यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या भोवती घेराव घातला. कडक सुरक्षेत नितीश कुमार यांनी आपले भाषण पूर्ण केले.

सुरक्षारक्षक कांदा फेकलेल्या व्यक्तीला पकडण्यासाठी जात असताना नितीश कुमार यांनी त्यांना अडवले. या लोकांना सोडून द्या काही दिवसांत ते समजून जातील असे नितीश कुमार म्हणाले.

या घटनेवरून मंत्री संजय कुमार झा यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. विरोधकांना समजले आहे की, ते मतांच्या आधारे आम्हाला हरवू शकत नाही, त्यामुळे अशा प्रकारच्या घटना घडवत आहेत, असे म्हणत झा यांनी विरोधकांवर टीका केली. तसेच नितीश कुमार यांच्यावर झालेला हल्ला हा जीवघेणा असल्याचेही झा यांनी म्हटले आहे.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीचे दुसऱ्या टप्प्यातील मतदान सुरू आहे. हे मतदान 17 जिल्ह्यातील 94 विधानसभा जागांसाठी होत आहे. या टप्प्यात एकूण 1463 उमेदवार आपलं नशीब अजमावत आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.