kolkata knight riders Retained and Released Players List :- विश्वचषक 2023 च्या नंतर संपूर्ण जगाच्या नजरा जगातील सर्वात मोठ्या T20 लीग IPL 2024 वर खिळल्या आहेत. आयपीएल स्पर्धेच्या पुढील मोसमासाठी रविवारी सर्व 10 संघांनी आपल्या कायम ठेवलेल्या व रीलीज केलेल्या खेळाडूंची यादी BCCI कडे सादर केली आहे.
सर्व संघांनी आपल्या पर्समधील रकमेत वाढ व्हावी यासाठी अनेक खेळाडूंना रीलीज केले आहे. आता नव्या मोसमासाठी येत्या 19 डिसेंबरला दुबईत लिलाव होणार असून त्यासाठी अनेक संघांनी गेल्या मोसमात मोठी किंमत देत खरेदी केलेल्याही काही खेळाडूंना रीलीज केले आहे.
दरम्यान, कोलकाता नाइट रायडर्स (KKR) संघाकडून मोठी बातमी समोर येत आहे की KKR ने IPL 2024 पूर्वी शार्दुल ठाकूरसह या 12 खेळाडूंना सोडले आहे. कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरला IPL 2024 पूर्वी बाहेरचा रस्ता दाखवला आहे. शार्दुल ठाकूर गेल्या मोसमात केकेआरसाठी विशेष काही करू शकला नाही. ठाकूरने गेल्या वर्षी केकेआरसाठी 11 सामने खेळले. ज्यामध्ये त्याने 14.13 च्या खराब सरासरीने फलंदाजी करताना केवळ 111 धावा केल्या. तर गोलंदाजीत त्याला विशेष कामगिरी करता आली नाही आणि केवळ 7 विकेट घेतल्या.
IPL 2024 : पंजाब किंग्सने सर्वात महागड्या खेळाडूला ठेवलं कायम; तर ‘या’ 5 खेळाडूंना केलं रिलीज….
याशिवाय साऊथी आणि लॉकी फर्ग्युसन यांनाही आयपीएल 2024 च्या लिलावासाठी वगळण्यात आले आहे. साऊथीचा केवळ 2 सामन्यांमध्ये समावेश करण्यात आला होता. ज्यामध्ये तो केवळ 2 विकेट घेण्यात यशस्वी ठरला होता. तर लॉकी फर्ग्युसनने 3 सामन्यात 2 बळी घेतले.
आयपीएल 2024 मध्ये कोलकाता नाइट रायडर्सचा (KKR) कर्णधार बदलणार आहे. कारण गेल्या वर्षी केकेआरचा नियमित कर्णधार श्रेयस अय्यर पूर्णपणे तंदुरुस्त नव्हता. त्यामुळे नितीश राणा यांच्याकडे केकेआरचे कर्णधारपद सोपवण्यात आले. केकेआर संघाने राणाच्या कर्णधारपदाखाली 6 सामने जिंकले होते तर 8 सामने गमावले होते. आता अय्यर पूर्णपणे तंदुरुस्त आणि चांगल्या फॉर्ममध्ये आहे. 2023 च्या विश्वचषक स्पर्धेत त्याने स्फोटक पद्धतीने धावा केल्या. त्यामुळे श्रेयस अय्यर 17 व्या सत्रात पुन्हा कर्णधार म्हणून दिसणार आहे.
IPL 2024 : गुजरात टायटन्सच्या ‘त्या’ निर्णयामुळे मुंबई इंडियन्सला मोठा धक्का; हार्दिक पांड्या हा….
कोलकाता नाईट रायडर्स
KKR released players list : शाकिब अल हसन, लिटन दास, आर्य देसाई, डेव्हिड वीस, एन जगदीसन, मनदीप सिंग, कुलवंत खेजरोलिया, शार्दुल ठाकूर, लॉकी फर्ग्युसन, उमेश यादव, जॉन्सन चार्ल्स, टिम साऊदी.
KKR Retention List : श्रेयस अय्यर (कर्णधार), रिंकू सिंग, रहमानउल्ला गुरबाज, आंद्रे रसेल, नितीश राणा, व्यंकटेश अय्यर, जेसन रॉय, अनुकुल रॉय, सुनील नरेन, वैभव अरोरा, हर्षित राणा, सुयश शर्मा, वरुण चक्रवर्ती.