Punjab Kings Retained and Released Players List :- आयपीएल स्पर्धेच्या पुढील मोसमासाठी रविवारी सर्व 10 संघांनी आपल्या कायम ठेवलेल्या व रीलीज केलेल्या खेळाडूंची यादी सादर केली आहे. सर्व संघांनी आपल्या पर्समधील रकमेत वाढ व्हावी यासाठी अनेक खेळाडूंना रीलीज केले आहे. आता नव्या मोसमासाठी येत्या 19 डिसेंबरला दुबईत लिलाव होणार असून त्यासाठी अनेक संघांनी गेल्या मोसमात मोठी किंमत देत खरेदी केलेल्याही काही खेळाडूंना रीलीज केले आहे.
इंडियन प्रीमियर लीग फ्रँचायझी पंजाब किंग्सने रविवारी (26 नोव्हेंबर) आपल्या कायम ठेवलेल्या आणि सोडलेल्या खेळाडूंची संपूर्ण यादी जाहीर केली. संघाने आपला सर्वात महागडा खेळाडू सॅम करन याला कायम ठेवले आहे. गेल्या मोसमात अत्यंत महागात विकला गेलेला शाहरुख खान याला पंजाबने सोडला आहे. पंजाबने केवळ पाच खेळाडूंना सोडले आहे.
आयपीएलच्या पहिल्या विजेतेपदाचा शोध संपवण्यासाठी पंजाब किंग्स संघात बरेच बदल झाले आहेत पण संघाला यश मिळालेले नाही. आयपीएल 2023 मध्ये पंजाब किंग्जची कामगिरी चांगली नव्हती. संघाने 14 पैकी फक्त 6 सामने जिंकले आणि गुणतालिकेत आठव्या स्थानावर राहिली. आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू असलेल्या सॅम करनला पंजाब किंग्ज संघाने कायम ठेवले आहे. पंजाबने त्याला 18.5 कोटी रुपये देऊन संघात समाविष्ट केले होते.
पंजाब किंग्स :
PBKS Released players List : भानुका राजपक्षे, मोहित राठी, बलतेज धांडा, राज अंगद बावा, शाहरुख खान.
PBKS Retention List : शिखर धवन(कर्णधार), जॉनी बेअरस्टो, जितेश शर्मा, प्रभसिमरन सिंग, मॅथ्यू शॉर्ट, हरप्रीत भाटिया, अथर्व तायडे, ऋषी धवन, सॅम कुरन, सिकंदर रझा, लियाम लिव्हिंगस्टोन, गुरनूर सिंग ब्रार, शिवम सिंग, राहुल चहर, अर्शदीप सिंग, हरप्रीत ब्रार, विद्वान. कावेरप्पा, कागिसो रबाडा, नॅथन एलिस.