Indian Premier League 2024 (Live Cricket Score, CSK vs SRH) : आज आयपीएलच्या 46 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज (CSK) विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद आमने-सामने आहेत. चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर हा सामना खेळला जात आहे. सनरायझर्स हैदराबाद संघ यंदाच्या मोसमात चमकदार कामगिरी करत आहे. गेल्या सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला असला तरी त्यांचे फलंदाज जबरदस्त फॉर्मात आहेत. दुसरीकडे गेल्या सामन्यात चेन्नई सुपरजायंट्सचा लखनौ सुपर जायंट्सकडून पराभव झाला होता. अशा परिस्थितीत दोन्ही संघ पुनरागमनाच्या शोधात आहेत.
तत्पूर्वी, झालेला नाणेफेकीचा कौल हा सनरायझर्स हैदराबाद संघाच्या बाजूनं लागला आहे. चेन्नई सुपर किंग्ज (CSK) विरुद्ध सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. चेन्नई सुपर किंग्जचे खेळाडू प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरतील. हैदराबादने या सामन्यासाठी मयंक मार्कंडेला प्लेइंग-11 मधून बाहेर ठेवले आहे.
🚨 Toss Update 🚨@SunRisers elect to bowl against @ChennaiIPL
Follow the Match ▶️ https://t.co/uZNE6v8QzI#TATAIPL | #CSKvSRH pic.twitter.com/AjWB7qtGwC
— IndianPremierLeague (@IPL) April 28, 2024
CSK vs SRH : दोन्ही संघांची प्लेइंग 11 खालीलप्रमाणे….
चेन्नई सुपर किंग्ज : अजिंक्य रहाणे, रुतुराज गायकवाड (कर्णधार), डॅरिल मिशेल, मोईन अली, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, महेंद्रसिंग धोनी (यष्टीरक्षक), दीपक चहर, तुषार देशपांडे, मुस्तफिजुर रहमान, मथिशा पाथिराना.
इम्पॅक्ट सब : समीर रिझवी, शार्दुल ठाकूर, शेख रशीद, रचिन रवींद्र, मिचेल सँटनर.
सनरायझर्स हैदराबाद : अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), नितीश रेड्डी, अब्दुल समद, शाहबाज अहमद, पॅट कमिन्स (कर्णधार), भुवनेश्वर कुमार, जयदेव उनाडकट, टी. नटराजन.
इम्पॅक्ट सब : उमरान मलिक, मयंक मार्कंडे, अनमोलप्रीत सिंग, ग्लेन फिलिप्स, वॉशिंग्टन सुंदर.
हैदराबाद आणि चेन्नई – दोघांनीही आपले मागील सामने गमावले आहेत आणि अशा परिस्थितीत दोन्ही संघ हा सामना जिंकून प्लेऑफसाठी आपला दावा मजबूत करण्याचा प्रयत्न करतील. 2016 चे चॅम्पियन हैदराबाद सध्या 8 पैकी पाच विजय आणि तीन पराभवानंतर 10 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. त्याच वेळी, पाच वेळचा चॅम्पियन सीएसके आठ पैकी चार विजय आणि तेवढ्याच पराभवानंतर आठ गुणांसह सहाव्या स्थानावर आहे.
दरम्यान, चेन्नई संघाचा हैदराबादविरुद्धचा विक्रम खूपच मजबूत आहे. जेव्हा जेव्हा दोन्ही संघ आमनेसामने आले तेव्हा चेन्नईने वर्चस्व गाजवले. चेन्नई आणि हैदराबाद यांच्यात आतापर्यंत 20 सामने झाले असून त्यात चेन्नईने 14 सामने जिंकले आहेत. तर हैदराबादने केवळ 6 सामने जिंकले आहेत. या मोसमातील उभय संघांमधील हा दुसरा सामना आहे. यापूर्वी 5 एप्रिल रोजी चेन्नई आणि हैदराबादमध्ये टक्कर झाली होती. ज्यामध्ये हैदराबादने चेन्नईला 165 धावांवर रोखले आणि अवघ्या 18.1 षटकात 6 विकेट्स राखून सामना जिंकला. अशा स्थितीत चेन्नईला त्या पराभवाचा बदला घ्यायचा आहे.