मंबई :– आयपीएल स्पर्धेच्या पुढील मोसमासाठी रविवारी सर्व 10 संघांनी आपल्या कायम ठेवलेल्या व रीलीज केलेल्या खेळाडूंची यादी सादर केली आहे. सर्व संघांनी आपल्या पर्समधील रकमेत वाढ व्हावी यासाठी अनेक खेळाडूंना रीलीज केले आहे. आता नव्या मोसमासाठी येत्या 19 डिसेंबरला दुबईत लिलाव होणार असून त्यासाठी अनेक संघांनी गेल्या मोसमात मोठी किंमत देत खरेदी केलेल्याही काही खेळाडूंना रीलीज केले आहे.
दरम्यान, गुजरात टायटन्सने त्यांचा कर्णधार हार्दिक पांड्याला कायम ठेवले आहे. यापूर्वी हार्दिक मुंबई इंडियन्सकडे परत जाणार असल्याची अटकळ होती. मात्र, आता त्याच्या मुंबई इंडियन्समध्ये परत येण्याबाबतच्या सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. त्यामुळे आता सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. गुजरातकडून हार्दिकला कायम ठेवण्यात आले आहे. म्हणजेच हार्दिक पुढील हंगामात गुजरातचे कर्णधारपद भूषवताना दिसणार आहे.
GT released players list : गुजरातने आठ खेळाडूंना सोडले (रीलीज) आहे. यामध्ये यश दयाल, केएस भरत, शिवम मावी, उर्विल पटेल, प्रदीप सांगवान, ओडियन स्मिथ, अल्झारी जोसेफ आणि दासुन शनाका यांच्या नावांचा समावेश आहे.
Gujarat Titans Retention List : हार्दिक पंड्या (कर्णधार), शुभमन गिल, केन विल्यमसन, डेव्हिड मिलर, अभिनव मनोहर, वृद्धिमान साहा, मॅथ्यू वेड, साई सुदर्शन, राहुल तेवतिया, विजय शंकर, जयंत यादव, दर्शन नळकांडे, मोहम्मद शमी, जोशुआ लिटल, आर साई किशोर, मो. शर्मा, नूर अहमद, रशीद खान.
दरम्यान, हार्दिकने 2015 मध्ये मुंबई इंडियन्समधून आयपीएल करिअरला सुरुवात केली. कर्णधार हार्दिक पांड्याने त्याच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्सला विजेतेपद मिळवून दिलं आहे.