Delhi Capitals Retained and Released Players List :- आयपीएल स्पर्धेच्या पुढील मोसमासाठी रविवारी सर्व 10 संघांनी आपल्या कायम ठेवलेल्या व रीलीज केलेल्या खेळाडूंची यादी सादर केली आहे. सर्व संघांनी आपल्या पर्समधील रकमेत वाढ व्हावी यासाठी अनेक खेळाडूंना रीलीज केले आहे. आता नव्या मोसमासाठी येत्या 19 डिसेंबरला दुबईत लिलाव होणार असून त्यासाठी अनेक संघांनी गेल्या मोसमात मोठी किंमत देत खरेदी केलेल्याही काही खेळाडूंना रीलीज केले आहे.
ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील दिल्ली कॅपिटल्सने आयपीएल 2024 ची तयारी सुरू केली आहे. संघाने आपली राखून ठेवलेली यादी 26 नोव्हेंबर रोजी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच BCCI कडे सादर केली आहे. दिल्ली कॅपिटल्सने आयपीएल 2024 साठी आपला अर्धा संघ बदलण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे दहाहून अधिक खेळाडूंना Delhi Capitals सोडावे लागले. संघ व्यवस्थापनाने मनीष पांडेसह या 11 खेळाडूंना सोडचिठ्ठी दिली आहे.
26 नोव्हेंबर रोजी दिल्ली कॅपिटल्सने आयपीएल 2024 साठी आपली कायम ठेवलेल्या खेळाडूची यादी बीसीसीआयकडे सादर केली. फ्रँचायझीने आपला अर्धा संघ बदलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मनीष पांडेसह 11 खेळाडूंना संघातून वगळावे लागले. मात्र, यादरम्यान अनेक मोठी नावेही पुढे आली आहेत. आयपीएल 2023 मध्ये प्रभावी कामगिरी करणाऱ्या फिल सॉल्टलाही दिल्ली कॅपिटल्सने संघातून बाहेरचा रस्ता दाखवला आहे. याशिवाय रिली रुसो, रिपल पटेल आणि सरफराज खान हे देखील पुढील आवृत्तीत दिल्लीचा भाग असणार नाहीत.
IPL 2024 : गुजरात टायटन्सच्या ‘त्या’ निर्णयामुळे मुंबई इंडियन्सला मोठा धक्का; हार्दिक पांड्या हा….
आयपीएल 2024 दिल्ली कॅपिटल्सच्या चाहत्यांसाठी खूप खास असणार आहे. कारण कर्णधार ऋषभ पंत दुखापतीमुळे IPL 2023 चा भाग होऊ शकला नाही. मात्र आता त्याचे पुनरागमन अपेक्षित आहे. याशिवाय दिल्ली कॅपिटल्सनेही पृथ्वी शॉ ला कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, सध्या तो क्रिकेटपासून दूर असून दुखापतीतून सावरण्याचा प्रयत्न करत आहे. डेव्हिड वॉर्नर, अभिषेक पोरेल, अक्षर पेटल, ललित यादव सारखे खेळाडू देखील आयपीएल 2024 मध्ये Delhi Capitals चा भाग असतील.
दिल्ली कॅपिटल्स :
DC Released players List : मनीष पांडे, राइलो रुसो, चेतन साकारिया, रोवमन पॉवेल, फ्लिप सॉल्ट, मुस्तफिजुर रहमान, कमलेश नागरकोटी, रिपल पटेल, सरफराज खान, अमन खान, प्रियम गर्ग.
DC Retention List : ऋषभ पंत(कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, पृथ्वी शॉ, अभिषेक पोरेल, अक्षर पटेल, ललित यादव, मिचेल मार्श, यश धुल, प्रवीण दुबे, विकी ओस्तवाल, एनरिक नोर्टजे, कुलदीप यादव, लुंगी एनगिडी, खलील अहमद, इशांत शर्मा, मुकेश कुमार.