मुंबई – अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा OTT वर ‘दहाड’ या वेब सीरिजमधून डेब्यू करणार आहे. सोनाक्षी सिन्हा, विजय वर्मा, सोहम शाह यांसारख्या कलाकारांची ही वेब सिरीज १२ मे रोजी प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होत आहे. ‘दहाड’ या वेब सीरिज जुहू पीव्हीआर येथे त्याचे स्क्रीनिंग आयोजित करण्यात आले होते.
View this post on Instagram
यावेळी सोनाक्षी सिन्हापासून हुमा कुरेशी, विजय वर्मा, झोया अख्तर, रीमा कागती, फरहान अख्तर, शोभिता धुलिपाला आणि वरुण शर्मापर्यंत अनेक सेलिब्रिटी दिसले. याच प्रसंगाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यामध्ये हुमा कुरेशी आणि सोनाक्षी सिन्हा कॅमेऱ्यासमोर एकत्र पोज देताना दिसत आहेत.
सोनाक्षी तिच्या ‘डबल एक्सएल’ चित्रपटाची को-स्टार हुमा कुरेशीसोबत पोज देताना दिसली, या चित्रपटात दोन्ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत दिसल्या होत्या आणि इथेही दोघांची जोडी कॅमेऱ्यात थिरकली. मात्र, सोनाक्षीच्या शोच्या प्रमोशनवर हुमा कुरेशीने शो चोरला. हुमा येथे खूपच ग्लॅमरस दिसत होती आणि आकर्षणाचे केंद्र राहिली. दोघांनीही इथे कॅमेऱ्यासमोर एकत्र पोज दिली आणि हुमा सोनाक्षीला किस करतानाही दिसली. या व्हिडीओवर चाहते दोघांचेही कौतुक करत आहेत.