Renuka Shahane Post| एका कंपनीने मुंबईत नोकरी असूनही मराठी उमेदवारांना अर्ज करण्यास परवानगी नसल्याचे सांगितले. हे प्रकरण समोर आल्यानंतर या कंपनीवर अनेकांनी संताप व्यक्त केला. यानंतर आता अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी याच मुद्द्यावरून मराठी माणसांसोबत होत असलेला दुजाभाव आणि निवडणुकीच्या वातावरणात जनतेच्या बहुमूल्य मतांबद्दल मोठं वक्तव्य केले आहे. रेणुका शहाणे यांनी एक पोस्ट शेअर करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
मराठी “not welcome” म्हणणार्या लोकांना कृपया मत देऊ नका 🙏🏽
मराठी लोकांना घरं न देणाऱ्या लोकांचे समर्थन करणाऱ्या उमेदवारांना कृपया आपलं बहुमूल्य मत देऊ नका 🙏🏽
ज्यांच्या कामाच्या ठिकाणी मराठी भाषा किंवा लोकांना कमी लेखलं जातं, अशा लोकांचे समर्थन करणाऱ्या उमेदवारांना किंवा पक्षाला…— Renuka Shahane (@renukash) May 7, 2024
रेणुका शहाणे यांची पोस्ट Renuka Shahane Post|
लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना रेणुका शहाणेने मराठी माणसांसोबत दुजाभाव करणाऱ्यांना आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्यांना मतदान न करण्याचे आवाहन केले आहे. रेणुका शहाणे यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले की, “मराठी ‘Not Welcome’ म्हणणार्या लोकांना कृपया मत देऊ नका. मराठी लोकांना घरं न देणाऱ्या लोकांचे समर्थन करणाऱ्या उमेदवारांना कृपया आपलं बहुमूल्य मत देऊ नका. ज्यांच्या कामाच्या ठिकाणी मराठी भाषा किंवा लोकांना कमी लेखले जाते. अशा लोकांचे समर्थन करणाऱ्या उमेदवारांना किंवा पक्षाला कृपया मत देऊ नका,”असे आवाहनही रेणुका शहाणे यांनी केले. Renuka Shahane Post|
पुढे त्या म्हणाल्या की, “मी कुठल्याही जाती, धर्म किंवा भाषेच्या विरुद्ध नाही, पण जे आपल्याच महाराष्ट्रात, आपल्या भाषेचा आणि संस्कृतीचा मान ठेवत नाहीत, अशा लोकांना, शांतपणे, मत न देऊन, त्यांची चूक दाखवून दिलीच पाहिजे,” अशी स्पष्ट भूमिका रेणुका शहाणे यांनी या पोस्टद्वारे मांडली. त्यांच्या या पोस्टचे अनेक नेटकऱ्यांनी समर्थन केले आहे. तर काहींनी त्यांच्या या भूमिकेला विरोधही केला आहे. ‘आशुतोष राणा आणि तुम्ही मराठीत किती काम करता?’असा असा सवालही एका नेटकऱ्याने केला आहे.
हेही वाचा: