Varun Dhawan Angry On Paparazzi| बॉलीवूड अभिनेता वरुण धवन सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. अनेक व्हिडिओ आणि फोटो तो शेअर करताना दिसतो. काही दिवसांपूर्वीच त्याने सोशल मीडियावर पोस्टद्वारे लवकरच बाबा होणार असल्याचे सांगितले होते. परंतु सध्या त्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात वरुण धवन हा संतापल्याचे पाहायला मिळत आहे.
त्याचे झाले असे की, वरूण धवन एका रूग्णालयात जात होता. त्याचवेळी पापाराझींनी त्याला घेरले. त्यावेळी वरुण संतापला आणि ‘डाॅक्टरांकडे जात आहे, तुला आत यायचयं का?’ असे पापाराझींना म्हणाला. यानंतर तो रागात तेथून निघून जातो. मात्र यावरून अनेकांनी वरूणला ट्रोल केले आहे. त्याचे असे वागणे अनेकांच्या पसंतीस पडलेले नाही.
View this post on Instagram
दरम्यान, वरुण धवन याचा काही दिवसांपूर्वीच बवाल हा चित्रपट रिलीज झाला. विशेष म्हणजे बवाल चित्रपटामध्ये तो जान्हवी कपूरसोबत स्क्रीन शेअर करताना दिसला. मात्र बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट फ्लॉप ठरला. आता लवकरच वरुणचा ‘बेबी जॉन’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तसेच तो ‘सिटाडेल’ चित्रपटातही झळकणार आहे. यामध्ये त्याच्याबरोबर साऊथ अभिनेत्री सामंथा प्रभुची मुख्य भूमिका आहे.
हेही वाचा:
“मराठी ‘Not Welcome’ म्हणणार्या…”; निवडणुकांदरम्यान रेणुका शहाणेंची पोस्ट चर्चेत