खतरों के खिलाडी 14 खूप दिवसांपासून चर्चेत आहे आणि प्रत्येकजण नवीन सीझनबद्दल बोलत आहे. प्रत्येकाला शोबद्दलच्या सर्व गोष्टी जाणून घ्यायच्या आहे. लवकरच सुरू होणारा हा शो पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहे. सहसा शोचे शूटिंग मे महिन्यात सुरू होते. अशात या शोची घोषणा लवकरच होऊ शकते. नवीन सीझनबद्दल बरेच काही बोलले जात आहे.
यावेळीही निर्मात्यांनी शोच्या संदर्भात अनेक नवीन स्टंट करण्याची योजना आखली आहे आणि म्हणूनच शूटिंगसाठी नवीन जागा ठेवण्याचा निर्णयही घेतला आहे. शूटिंग केपटाऊनमध्ये व्हायचे पण आता ठिकाण बदलू शकते. शूटिंग थायलंड, जॉर्जिया, बल्गेरिया किंवा रोमानियामध्ये होऊ शकते. अशात शिल्पा शिंदेला ‘खतरों के खिलाडी 14’ करत असल्याची समोर येत आहे.
खतरों के खिलाडी 14 साठी शिल्पा खूप उत्साहित आहे अशीही चर्चा आहे. मात्र, याबाबत शिल्पा शिंदेकडून अद्याप काहीही दुजोरा मिळालेला नाही. याशिवाय सुमोना चक्रवर्ती, मनीषा राणी, विवेक दहिया, हेली शाह, निमृत कौर अहलुवालिया, नील भट्ट, शोएब इब्राहिम, खानजादी यांना खतरों के खिलाडी 14 च्या ऑफर मिळाल्या आहेत. यापूर्वी शिल्पाने तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर झलक दिखला जा 10 जज करण जोहर आणि नोरा फतेही यांच्यावर टीका करणारे व्हिडिओ शेअर केला होता.