Rutuja Bagwe In Hindi Tv Show| मराठी मनोरंजनसृष्टीतील अनेक कलाकार हिंदी कलाविश्वात देखील झळकत असल्याचे पाहायला मिळत आहे. अभिनेत्री ऋतुजा बागवेनेही आतापर्यंत नाटक, मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. यानंतर आता ती लवकरच हिंदी मालिकांमध्ये पाहायला मिळणार आहे.
ऋतुजा ‘माती से बंधी डोर’ या हिंदी मालिकेत ‘वैजू’ ही मुख्य व्यक्तिरेखा साकारणार आहे. यात तिच्यासोबत अभिनेता व ‘बिग बॉस’ फेम अंकित गुप्ता प्रमुख भूमिका साकारणार आहे. त्याच्या पात्राचं नाव ‘रणविजय’ आहे. या मालिकेचं दिग्दर्शन भीमराव मुडे करत आहे. ही एका कन्नड मालिकेचा रिमेक असल्याचे देखील म्हंटले जात आहे.
या नव्या मालिकेविषयी ऋतुजा म्हणाली की, “मी कित्येक दिवसापासून चांगल्या भूमिकेच्या शोधात होते. नाटक-सिनेमे करताना मला मालिकेत काम करायला पाहिजे असं नेहमी वाटत होते. पडद्यावर सतत दिसणं ही कलाकारांची गरज आहे. मालिकाविश्व बाहेरुन सोपं वाटत असलं तरी, ते आम्हा कलाकारांसाठी खूपच आव्हानात्मक असतं. सातत्याने प्रेक्षकांचं मनोरंजन करावे, पण वेगळ्या भूमिका साकारायला मिळायले पहिजे. हे विचार सुरु असतानाच या मालिकेबद्दल विचारणा झाली.”
दरम्यान, ऋतुजा बागवेने यापूर्वी ‘नांदा सौख्य भरे’, ‘ह्या गोजिरवाण्या घरात’, ‘एका लग्नाची तिसरी गोष्ट’ यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. या मालिकांमुळे तिला मोठी लोकप्रियता मिळाली. आता पुन्हा एकदा ती मालिकेत झळकणार आहे. पण, यावेळी ऋतुजा मराठी नाही तर ‘माटी से बंधी डोर’ या हिंदी मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.
हेही वाचा:
खतरों के खिलाडी 14 मध्ये शिल्पा शिंदेची ‘एन्ट्री’