Himachal Pradesh । हिमाचल प्रदेशमध्ये 27 फेब्रुवारीला राज्यसभा निवडणुकीदरम्यान झालेल्या क्रॉस व्होटिंगनंतर निर्माण झालेले राजकीय वादळ अजूनही थांबले नाही. हिमाचल प्रदेशमधील राज्यसभेच्या जागेवर झालेल्या निवडणुकीत भाजपच्या बाजूने मतदान करणारे सर्व सहा बंडखोर काँग्रेस नेते भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता वर्तवण्यात येतीय.
काँग्रेसच्या बंडखोरांचा भाजप प्रवेश होणार ही चर्चा बराच वेळ सुरू होती. या चर्चेला आज पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे. हिमाचल भाजपचे अध्यक्ष डॉ.राजीव बिंदल आधीच दिल्लीत आहेत. गुरुवारी सहा बंडखोर नेत्यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांची भेट घेतली. तेव्हा बिंदल त्याठिकाणी उपस्थित होते. भाजपच्या नियोजनानुसार सर्व काही घडले तर बंडखोर आजच भाजपमध्ये प्रवेश करू शकतात, असं म्हटलं जातंय.
दिल्लीतच आजच पक्षप्रवेश ? Himachal Pradesh ।
हिमाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते जयराम ठाकूर हेही शुक्रवारीच दिल्लीला रवाना झालेत. भाजपने शुक्रवारी संध्याकाळी ६ वाजता विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावली होती, मात्र त्यापूर्वीच जयराम ठाकूर दिल्लीला रवाना झाले.
प्राप्त माहितीनुसार, काँग्रेसच्या सहा बंडखोर नेत्यांसह अपक्ष आमदार म्हणून राजीनामा दिलेले आमदारही भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहेत. हे नेते भाजपमध्ये प्रवेश करताना भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर, माजी मुख्यमंत्री जयराम ठाकूर, हिमाचल भाजपचे अध्यक्ष डॉ.राजीव बिंदल आणि राज्यसभा निवडणुकीत विजयी झालेले हर्ष महाजन उपस्थित राहणार आहेत.
पोटनिवडणूक आधीच जाहीर झाली Himachal Pradesh ।
हिमाचल प्रदेशमध्ये सातव्या आणि शेवटच्या टप्प्यात लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. चार जागांवर लोकसभा निवडणुकीसोबतच सहा विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुकाही जाहीर झाल्या आहेत. तीन अपक्ष आमदारांच्या राजीनाम्यानंतर आता तीन नव्या जागाही रिक्त झाल्या आहेत. अशा स्थितीत निवडणूक आयोग लवकरच याठिकाणीही पोटनिवडणूक जाहीर करण्याची शक्यता आहे. मात्र, याशिवाय भाजप आणखी एका सूत्रावर काम करत आहे. त्यामुळे राज्यात पोटनिवडणुकाच नव्हे तर मध्यावधी निवडणुकाही होऊ शकतात.
हे नेते भाजपमध्ये प्रवेश करू शकतात
धर्मशाला – सुधीर शर्मा
लाहौल स्पिती – रवि ठाकूर
सुजानपूर – राजिंदर राणा
बडसर – इंद्र दत्त लखनपाल
गगरेट – चैतन्य शर्मा
कुटलाईहार – देवेंद्र कुमार भुट्टो
नलगड – कृष्णलाल ठाकूर
देहरा – होशियार सिंग
हमीरपूर- आशिष शर्मा