Shivaji Adharao Patil In NCP| शिंदे गटाचे नेते आढळाराव पाटील आता राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे निश्चित झाल्याची माहिती मागील काही दिवसांपासून चर्चेत आहे. शिवाजीराव आढळराव पाटील राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या घड्याळ चिन्हावर लोकसभा लढवणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यातच आता शिवाजीराव आढळराव पाटील आज अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे. अजित पवारांनी मुंबईत बैठक बोलवली असून त्यावेळी आढळाराव पाटील राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत.
अजित पवारांनी बोलावलेल्या बैठकीला शिरूर लोकसभा मतदारसंघातील अजित पवार गटाचे आमदार उपस्थित राहणार आहेत. आज सकाळी 10 वाजता मुंबईत देवगिरी बंगल्यावर बैठक होणार आहे. दरम्यान, शिरुर लोकसभेची जागा महायुतीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मिळणार आहे. तर शिंदे गटात असलेले शिवाजी आढळराव पाटील या जागेवरुन लढण्यास इच्छुक असल्याने ते पक्षप्रवेश करत अमोल कोल्हे यांच्याविरोधात मैदानात उतरणार आहेत.
कोण आहेत शिवाजी आढळराव पाटील? Shivaji Adharao Patil In NCP|
मूळचे आंबेगावचे असलेले शिवाजी आढळराव पाटील हे भिमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन आहेत. 2004, 2009 आणि 2014 साली त्यांनी शिवसेनेकडून लोकसभा निवडणूक लढवत मोठा विजय मिळवला होता. मात्र 2019 मध्ये त्यांचा पराभव झाला होता. 2004 मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केला होता. आता पुन्हा ते राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात पक्षप्रवेश करणार आहेत.
2019 मध्ये अमोल कोल्हेंकडून आढळराव पाटलांचा पराभव Shivaji Adharao Patil In NCP|
खासदार अमोल कोल्हे यांनी शिवसेनेतून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत ही निवडणूक लढली होती. त्यावेळी त्यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार शिवाजी आढळराव पाटील यांचा पराभव केला होता. आता पुन्हा एकदा अमोल कोल्हे आणि शिवाजी आढळराव पाटील यांच्या लढत होणार असल्याचे चित्र आहे.
हेही वाचा:
हिमाचलमध्येही भाजपचे खेला होबे ! काँग्रेसच्या ‘या’ बंडखोरांचा आज पक्ष प्रवेश?