पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण चिंचवड विधानसभा मतदारसंघात आयोजित केलेल्या महाआरोग्य शिबिरात 3 हजार 399 नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. तर 2 हजार 695 जणांनी रक्तदान केले.
काटे यांचा स्वातंत्र्यदिनी वाढदिवस होता. यानिमित्त आयोजित केलेल्या महाआरोग्य व रक्तदान शिबिराचे उद्घाटन आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते झाले. या वेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईर, माजी महापौर संजोग वाघेरे, माजी नगरसेवक पंकज भालेकर, मोरेश्वर भोंडवे, प्रशांत शितोळे, अतुल शितोळे, प्रभाकर वाघेरे, महिला शहराध्यक्षा कविता आल्हाट, श्रीधर वाल्हेकर, राजेंद्र साळुंखे, शीतल शिंदे, नीलेश बारणे, सचिन चिंचवडे, राजेंद्र चिंचवडे, शेखर चिंचवडे, प्रसाद शेट्टी, माउली सूर्यवंशी, खंडू कोकणे, राजेंद्र जगताप, राजू लोखंडे, सागर कोकणे, श्याम जगताप, तानाजी जवळकर, अतुल काशीद, गणेश फुगे, प्रसन्न डांगे, चंद्रकांत तापकीर, मल्हारी तापकीर, सुनील ढोरे, शेखर काटे, विवेक तापकीर, बाळासाहेब पिल्लेवार, माजी नगरसेविका शीतल नाना काटे, चंदा लोखंडे, सुषमा तनपुरे, अश्विनी तापकीर, शीतल शितोळे, संगीता कोकणे, प्रियंका कोकणे, तृप्ती जवळकर उपस्थित होते.
महाआरोग्य शिबिरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया, दातांचे उपचार, हृदयरोग शस्रक्रिया, कॅन्सरवरती उपचार, जनरल शस्त्रक्रिया, मणक्याचे विकार शस्त्रक्रिया याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. थेरगाव येथील पालिकेच्या रुग्णालयात राष्ट्रवादीतर्फे फळवाटप करण्यात आले. रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले. आरोग्य व रक्तदान शिबिरासाठी डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल, लोकमान्य हॉस्पिटल, संजीवनी ब्लड बॅंक, जनसेवा ब्लड बॅंक, रेड प्लस बॅंक या संस्थेच्या डॉक्टर, टीमने सहकार्य केले.
या शिबिराचे आयोजन माजी नगरसेवक प्रशांत शितोळे, अतुल शितोळे, पोपट जम, माजी नगरसेविका सुषमा तनपुरे, सामाजिक कार्यकर्त्या उज्ज्वला सुनील ढोरे, वैशाली पवार, सागर कोकणे, शिवाजी पाडुळे, शुभम वाल्हेकर, चंद्रकांत तापकीर, सागर परदेशी, पंकज कांबळे यांच्या वतीने करण्यात आले होते.
चिंचवड : माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या महाआरोग्य व रक्तदान शिबिराचे दीपप्रज्वलन करून उद्घाटन करताना आमदार सुनील शेळके, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, नाना काटे, ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईर, माजी महापौर संजोग वाघेरे, कविता आल्हाट, शीतल काटे यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.