कार्ला – देवघर जवळील जेवरेवाडी येथील श्री भैरवनाथ महाराज यात्रेच्या निमित्त बैलगाडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत वेहरगाव येथील सुरेश हुकाजी गायकवाड व किवळे येथील स्वप्नील तरस यांच्या लक्ष्या व वजीर बैलगाडीने प्रथम घाटाचा राजा त्यानंतर फायनल सम्राटचे पारितोषिक मिळविले. या स्पर्धेत द्वितीय क्रमांक शंभु व गुरु या बैल जोडीने मिळवला.
जेवरेवाडी येथे भैरवनाथ यात्रे निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. बैलगाडा शर्यतीत एकूण दोनशे बैलगाडा मालकांनी सहभाग नोंदविला. यातील पहिल्या पाच क्रमांकांना देवघर व वाकसई जेवरेवाडी येथील मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले. या बैलगाडा शर्यतीला लोणावळा परिसरातील विविध गावचे सरपंच,उपसरपंच, विविध पक्षाचे नेते आणि बैलगाडी शौकीनांनी हजेरी लावली.