Gold Silver price : देशभरात दिवाळीनंतर (Diwali 2023) आज सोन्याचे भाव (Gold Rate Today) जैसे थे परिस्थितीत असल्याची माहिती समोर आली आहे. शनिवारी, 18 नोव्हेंबर रोजी सोन्याच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. तर चांदीच्या दरात मात्र घसरण झाल्याचे सांगण्यात येत आहे.
आज चांदीची किंमत (Silver Rate Today) 500 रुपयांनी कमी झाली आहे. कर आणि उत्पादन शुल्कामुळे सोन्या-चांदीची किंमत दररोज चढ-उतार होत असतो. आज सोन्याचा भाव दर स्थिर आणि चांदी स्वस्त झाली आहे. आज देशात सोन्याचे दर स्थिर आहेत. 24 कॅरेट 10 ग्रॅम शुद्ध सोन्याचा भाव आज 61690 रुपये आहे, तर 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रतितोळा 56550 रुपये आहेत.
दिवाळीपासून सोने-चांदीच्या किमतीत सातत्याने चढ-उतार पाहायला मिळत आहे. आज एक किलो चांदीचा दर 76,000 रुपये आहे. चांदीचा दर (Silver Rate Today) शुक्रवारीही एक किलो चांदीचा दर 76,500 रुपये होता.
दिवाळीनंतर सोन्याच्या दरात प्रती तोळा 1800 रुपयांची वाढ झाल्याने सोन्याचे दर हे उच्चांकी पातळीवर जाऊन पोहोचले असल्याचं पाहायला मिळत आहे. जागतिक पातळीवर अमेरिकन फेडरल बँकाच्या व्याज दरात वाढ न झाल्याने गुंतवणूकदारांनी सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याकडे कल वळवला असल्याने सोन्याच्या मागणीत वाढ होऊन ही दर वाढ झाली असल्याचे म्हटले जात आहे.