कर्जत – लाईट ऑफ लाईफ ट्रस्ट रायगड, नंदुरबार आणि मुंबई विभागाचे पहिले निवासी प्रांतीय अधिवेशन कर्जत येथे उत्साहात पार पडले.
या कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेच्या संस्थापिका डॉ. विली यांच्या हस्ते झाले. यावेळी संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी कमल दमानिया, वरिष्ठ ऑफ एज्युकेशन मसुधीर कुमार गजभिये यांनी स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले.
लाईट ऑफ लाईफ ट्रस्ट ही संस्था आर्थिक दृष्ट्या मागास विदयार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकून ठेवण्याचे काम करते. या संस्थेमुळे असंख्य मुलांना त्यांच्या उज्वल भविष्याकडे जाण्याचा मार्ग सापडला आहे. गेल्या १७ वर्षापासून विविध प्रकल्पाच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तन घडवून आणण्यासाठी संस्थेकडून अविरत काम सुरू आहे. संस्थेचा भाग असलेल्या “टास्कफोर्स” या विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम, समस्या लक्षात घेऊन काम केले जाते. तसेच समाजामध्ये आदर्श नेतृत्व तयार करण्याच्या अनुषंगाने मार्गदर्शन केले जाते.
टास्क फोर्स सदस्यांसह संघटन बांधणी करण्यासाठी, समाजासाठी अधिक जबाबदार आणि उत्तरदायी बनविण्यासाठी लाईट ऑफ लाईफ ट्रस्ट रायगड, नंदुरबार आणि मुंबई विभागाचे पहिले निवासी प्रांतीय अधिवेशन तासगावकर कॉलेज, चांधई ,कर्जत येथे उत्साहात पार पडले.
यावेळी टास्कफोर्स प्रतिनिधींनी आपआपल्या विभागाच्या सामाजिक कामाचा आढावा सर्व उपस्थितांसमोर मांडला. या कार्यक्रमात 350 स्वयंसेवक सहभागी झाले होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रविकुमार टिकटे याचे विशेष सहकार्य लाभले.