पुणे – चहा पिण्यासाठी थांबलेल्या तरुणाच्या डोक्यात झाडाची फांदी पडली. यात त्याचा मृत्यू झाला. यानंतर खडबडून जागे झालेल्या महापालिका प्रशासनाने शहरभरात धोकादायक फांद्या काढण्याची मोहीम सुरू केली आहे. उद्यान विभाग आणि क्षेत्रीय कार्यालयातील वृक्ष प्राधिकरण समिती कर्मचार्यांनी हद्दीत पाहणी करावी.
त्यानुसार धोकादायक फांद्या तत्काळ काढण्याच्या सूचना देण्यात आल्या. उद्यान विभागाचे प्रमुख अशोक घोरपडे यांनी नुकतीच ही बैठक घेतली. बैठकीनंतर शहरात गेल्या दोन दिवसांपासून शासकीय सुट्टीच्या दिवशीही धोकादायक झाडे काढली जात असल्याचे चित्र आहे.
जीवित व वित्तहानी नको
ओंकारेश्वर येथे घडलेल्या घटनेत महापालिकेच्या तक्रार निवारण प्रणालीवर सहा महिन्यांपूर्वी तक्रार आली होती. त्यावर कारवाई करण्या ऐवजी ती बंद करण्यात आली असल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे, या पुढे कोणतीही अ ॉनलाइन तक्रार दखल घेतल्याशिवाय बंद करू नये. तक्रारीवर योग्य कार्यवाही करूनच ती बंद करत जीवित व वित्तहानी हानी टाळावी, अशा सूचना सर्वांना देण्यात आल्या आहेत.