DCM Ajit Pawar : राज्यासह देशभरातून नाशिकच्या सप्तशृंगी देवीच्या (saptshrungi Devi) दर्शनासाठी हजारो भाविक येत असतात. त्यामुळे भाविकांच्या सोयी सुविधांसाठी काम करणे महत्वाचे आहे. म्ह्णून श्री सप्तशृंगी देवी (saptshrungi Devi) संस्थानच्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला लवकरच मंजुरी दिली जाईल” अशी मोठी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे.
याविषयी बोलताना “येत्या सोमवारी याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बैठक बोलवण्यात आली आहे. या बैठकीत सप्तशृंगी देवी (saptshrungi Devi) तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासाठी 81 कोटी 86 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात येईल” असे अजित पवार (Ajit Pawar) यांनी नाशिकमध्ये केली आहे.
आज उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar) हे नाशिक (Nashik) दौऱ्यावर आहे. त्यावेळी कळवण शहरात शेतकरी सन्मान मेळाव्यात ते बोलत होते.
दरम्यान, कळवणला येण्यापूर्वी अजित दादांनी सप्तशृंगी गडावर जात सप्तशृंगी देवीचे दर्शन घेतले. यानंतर ते कळवणला रवाना झाले होते. येथील मेळाव्यात बोलताना त्यांनी सप्तशृंगी (saptshrungi Devi) तीर्थक्षेत्र विकास आराखड्याबाबत महत्वपूर्ण घोषणा केली आहे.