Ajit pawar | Sunetra Pawar | Supriya Sule – देशाचे लक्ष लागून राहिलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवार खासदार सुप्रिया सुळे आणि महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्यात जोरदार लढत होत आहे. गेल्या सहा महिन्यांत बारामतीचे होम गाऊंड ढवळून निघाले आहे. सध्या ही लढाई अटीतटीवर येऊन ठेपली आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर अजित पवार यांनी काकांशी फारकत घेऊन महायुतीचा रस्ता धरला. त्यानंतर बारामती लोकसभेतील समीकरणे बदलून गेली आहेत. अजित पवार यांनी महायुतीत सहभागी होताना बारामती, इंदापूर, दौंडचे शिलेदार हे त्यांच्यासमवेत गेले आहेत.
त्यामुळे बारामती, इंदापूर, दौंडची राजकीय ताकद ही सुनेत्रा पवार यांच्यासाठी जमेच्या बाजू आहेत. तीन तालुक्यांत सुनेत्रा पवार यांच्यासाठी महायुतीतील मातब्बर नेत्यांची फौज आहे. दरम्यान, आज बारामतीमध्ये सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी अजित पवार देखील मैदानात उतरले होते. यावेळी प्रचार सभेमध्ये बोलताना अजित पवारांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला.
अजित पवार म्हणाले की, “मलाही तुमच्या पाठिंब्याची, तुमच्या पवित्र मताची गरज आहे. बारामतीसाठी 7 तारखेला मतदान आहे. तीन मशीन येणार आहेत. पहिल्या मशीनमध्ये दोन नंबरला सुनेत्रा पवारांच नाव, शेजारी घड्याळ चिन्ह असेल ते बटण दाबा” असं अजित पवार म्हणाले.
अजित पवार पुढे म्हणाले, “ही भावकी गवकीची लढई नाही…राष्ट्रीय निवडणूक आहे… ताकाला जायचं आणि गडग लपवायचे ही माझी सवय नाही. काही लोक इथे येऊन एमआयडीसी चे स्वप्न दाखवून गेले.. ही निवडणूक भावनिक नाही.
ही रोजी रोटीची आहे. 2014 ला मत मागितली आणि तरी एमआयडीसी पूर्ण केली नाही. आणि तरी 2019 ला मत मागायला आलात… मी असतो तर मला लाज वाटली अस्ती. कोणत्या तोंडाने मत मागता. असं देखील यावेळी अजित पवार म्हणाले.
अजित पवारांची सुप्रिया सुळेंवर टीका | Ajit pawar | Sunetra Pawar | Supriya Sule
आत्ताच्या खासदारांनी पुस्तिका छापली. त्यात मी केलेली कामं छापली. मी केलं… मी केलं…. भोर साठी काय केलं? नुस्ती भाषणं. मी पण भाषणं करू शकतो. प्रशासनावर दरारा पाहीजे. 3 वेळा त्यांना निवडून दिलं. आता यांना निवडून द्या. मी भोर ला एमआयडीसी देणार. मी शब्दाला पक्का. असा खोचक टोला अजित पवारांनी भाषणातून लगावला.