बारामती (प्रतिनिधी)- उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार हे माळेगाव येथील कोपरा सभेत जय पवार यांच्या भाषणावेळी रिमझिम पाऊस सुरु झाला. मात्र, जय पवार यांनी पावसातही भाषण सुरु ठेवत आई सुनेत्रा पवार यांना मताधिक्य देण्याचे आवाहन केले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार आणि पार्थ पवार हे बारामती लोकसभा मतदारसंघातील सर्व विधानसभानिहाय मतदारसंघ पिंजून काढत आहेत. मतदारांच्या गाठीभेटी, संवाद साधत आहेत.
मागील अनेक दिवसांपासून आपल्या आई सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी दौरे करीत आहेत. जय पवार यांनी माळेगाव परिसरात बारामतीतील भाजपचे ज्येष्ठ नेते आणि शरद पवार यांचे बालपणीचे मित्र चंद्रराव तावरे, प्रचारप्रमुख बाळासाहेब तावरे, माळेगाव कारखान्याचे अध्यक्ष केशवराव जगताप, भाजपचे नेते रंजन तावरे यांच्यासह प्रचारदौरा केला.