MI vs DC Match Result : दिल्ली कॅपिटल्सने मुंबई इंडियन्सचा पराभव केला आहे. मुंबई इंडियन्ससमोर विजयासाठी 258 धावांचं लक्ष्य होतं, पण हार्दिक पंड्याचा संघ 20 षटकात 8 विकेट गमावत 247 धावाच करू शकला. अशाप्रकारे ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील दिल्ली कॅपिटल्सने 10 धावांनी विजय मिळवला.
या विजयानंतर दिल्ली कॅपिटल्सचे 10 सामन्यांत 10 गुण झाले आहेत. तर मुंबई इंडियन्सचे 9 सामन्यांत केवळ 6 गुण आहेत. या पराभवानंतर मुंबई इंडियन्सच्या प्लेऑफच्या आशांना मोठा धक्का बसला आहे.
मुंबई इंडियन्सकडून तिलक वर्माने 32 चेंडूत सर्वाधिक 63 धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत 4 चौकार आणि 4 षटकार मारले. हार्दिक पांड्याने 24 चेंडूत 46 धावांची तुफानी खेळी केली. मुंबई इंडियन्सच्या कर्णधाराने आपल्या खेळीत 4 चौकार आणि 3 षटकार मारले.
याशिवाय टीम डेव्हिडने 17 चेंडूत 2 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 37 धावा केल्या. इशान किशन 14 चेंडूत 20 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. तर रोहित शर्माने 8 चेंडूत 8 धावा करून माघारी परतला. 13 चेंडूत 26 धावा करून सूर्यकुमार यादव खलील अहमदचा बळी ठरला.
दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजांबद्दल बोललो तर मुकेश कुमार आणि रसीख दार सलाम हे सर्वात यशस्वी गोलंदाज होते. मुकेश कुमार आणि रसिक दार सलाम यांनी मुंबई इंडियन्सच्या 3-3 फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. याशिवाय खलील अहमदने 2 विकेट्स घेतल्या.
तत्पूर्वी,मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या दिल्ली कॅपिटल्सने 20 षटकांत 4 बाद 257 धावा केल्या. दिल्ली कॅपिटल्ससाठी जॅक फ्रेझर मॅकगर्गने 27 चेंडूत सर्वाधिक 84 धावा केल्या