RR vs LSG Match Result : राजस्थान रॉयल्सने लखनौ सुपर जायंट्सचा पराभव केला आहे. संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील राजस्थान रॉयल्ससमोर 197 धावांचे लक्ष्य होते. राजस्थान रॉयल्सने 19 षटकांत 3 गडी राखून हे लक्ष्य सहज गाठले.
या विजयासह राजस्थानचा संघ प्लेऑफच्या अगदी जवळ आला आहे. राजस्थान नऊ सामन्यांत आठ विजय आणि एक पराभवासह 16 गुणांसह अव्वल स्थानावर आहे, तर सामना गमावल्यानंतर केएल राहुलच्या नेतृत्वाखालील संघ पाच विजयांसह चौथ्या स्थानावर आहे.
संजू सॅमसनने 33 चेंडूत 71 धावांची सर्वोच्च खेळी खेळली. त्याने आपल्या खेळीत 7 चौकार आणि 4 षटकार मारले. तर ध्रुव जुरेल 34 चेंडूत 52 धावा करून नाबाद परतला. संजू सॅमसन आणि ध्रुव जुरेल यांच्यात चौथ्या विकेटसाठी 123 धावांची अखंड भागीदारी झाली.
लखनौ सुपर जायंट्सच्या 196 धावांच्या प्रत्युत्तरात फलंदाजीला आलेल्या राजस्थान रॉयल्सची सुरुवात चांगली झाली. सलामीवीर जोस बटलर आणि यशस्वी जैस्वाल यांनी 5.5 षटकात 60 धावा जोडल्या. 18 चेंडूत 34 धावा काढून जोस बटलर यश ठाकूरचा बळी ठरला. तर यशस्वी जैस्वालने 18 चेंडूत 24 धावांचे योगदान दिले. यशस्वी जैस्वालला मार्कस स्टॉइनिसने आपला बळी बनवले. मात्र, या मोसमात सातत्याने धावा करत असलेला रियान पराग 11 चेंडूत 14 धावा करून माघारी परतला. मात्र यानंतर संजू सॅमसन आणि ध्रुव जुरेलने डावाची धुरा सांभाळली.
लखनौ सुपर जायंट्सच्या गोलंदाजांबद्दल बोलायचे झाले तर यश ठाकूर व्यतिरिक्त मार्कस स्टॉइनिस आणि अमित मिश्राने प्रत्येकी 1 बळी घेतला.
DC vs MI : हार्दिक-तिलकची झंझावाती खेळी निष्फळ, दिल्लीचा मुंबईवर शानदार विजय
तत्पूर्वी, राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या लखनौ सुपर जायंट्सने 20 षटकांत 5 गडी गमावून 196 धावा केल्या. लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुलने 48 चेंडूत सर्वाधिक 76 धावा केल्या. लखनौ सुपर जायंट्सची सुरुवात खूपच खराब झाली. क्विंटन डी कॉक आणि मार्कस स्टॉइनिस 11 धावांवर पॅव्हेलियनमध्ये गेले होते. क्विंटन डी कॉकने 3 चेंडूत 8 धावा केल्या. मार्कस स्टॉइनिस एकही धाव न काढता पॅव्हेलियनमध्ये परतला. पण यानंतर केएल राहुल आणि दीपक हुड्डा यांनी पदभार स्वीकारला.
केएल राहुल आणि दीपक हुडा यांच्यात 115 धावांची भागीदारी झाली. दीपक हुडाने 31 चेंडूत 50 धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत 7 चौकार मारले. त्यानंतर लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुल 48 चेंडूत 76 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. केएल राहुलला आवेश खानने बाद केले. त्याचवेळी या मोसमात लखनौ सुपर जायंट्सकडून सातत्याने धावा करणाऱ्या निकोलस पुरणची बॅटही शांत राहिली. निकोलस पुरन 11 चेंडूत 11 धावा काढून संदीप शर्माचा बळी ठरला. आयुष बडोनीने 13 चेंडूत 18 धावांचे योगदान दिले. तर कृणाल पांड्याने 11 चेंडूत 15 धावा केल्या.
राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजांबद्दल बोलायचे झाले तर संदीप शर्माला 2 यश मिळाले. याशिवाय ट्रेंट बोल्ट, आवेश खान आणि रवी अश्विनने प्रत्येकी 1 बळी घेतला.