बांसवाडा (राजस्थान) – लग्नमंडप किंवा हॉस्पिटलमधून मतदार मतदानासाठी येत असल्याच्या अनेक कथा समोर आल्या असल्या तरी बांसवाडा येथे एका महिलेने तिच्या पतीला अंतिम निरोप दिल्यानंतर ती मतदानाला आल्याचे दिसले. यावेळी त्या महिलेचे कुटुंबिय आणि अन्य नातेवाईकही मतदान करण्यासाठी केंद्रावर पोहोचले होते. (She came to vote by giving fire to her husband)
जिल्ह्यातील भुंगरा शहरात शुक्रवारी मतदान संपण्याच्या काही मिनिटे अगोदर, ज्या महिलेच्या पतीचे काही तासांपूर्वी निधन झाले होते, ती मतदान करण्यासाठी आली होती. शुक्रवारी मतदान सुरू झाल्यानंतर काही वेळातच श्रीमती सूरजदेवी यांचे पती गणपतलाल यांचे निधन झाले. त्यांचा एक मुलगा परदेशात राहतो आणि दुसरा बांसवाडा येथे भाड्याच्या घरात राहतो. अंतिम संस्कारासाठी मुलांकडून साथ न मिळाल्याने सूरजदेवीने नातेवाईक आणि शेजाऱ्यांच्या मदतीने पती गणपतलाल यांच्यावर अंत्यसंस्कार केले.
दुपारी चार वाजता अंत्यसंस्कार करून घरी परतल्यानंतर त्यांच्या ओळखीच्यांनी त्यांना मतदानाचे महत्त्व सांगितले. यातून प्रेरित होऊन सूरजदेवी मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर गेल्या. अशा प्रकारे सूरजदेवी यांनी एक नवा आदर्श घालून दिल्याचे परिसरात बोलले जात आहे. यावेळी निवडणूक कर्मचा-यांनीही सूरजदेवींच्या धैर्याचे कौतुक केले.