नगर -महावितरणच्या ग्राहकांना योग्य वीजवापराचे अचूक वीजबिल देण्यासाठी मीटरचे रिडींग घेण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. कोणाच्याही संपर्कात न येता घराबाहेर असलेल्या वीजमीटरचे रिडींग घेण्यासाठी कर्मचाऱ्यांना वीजग्राहकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
स्थानिक प्रशासनाने परवानगी दिलेल्या भागामध्ये आणि करोना प्रतिबंधीत क्षेत्र वगळून वीज ग्राहकांकडील मीटरचे रिडींग घेण्यात येत आहे. संबंधीत एजन्सीजच्या कर्मचाऱ्यांनी मीटर रिडींग घेताना फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सर्व मीटर ग्राहकांच्या घराबाहेर असल्याने तसेच अपार्टमेंटमध्ये वीज मीटरची तळमजल्यावर स्वतंत्र खोली असल्याने रिडींगसाठी घरात जाण्याची गरज नाही.