तुम्ही व्हॉट्सॲपच्या नियम आणि अटींचे उल्लंघन केल्यास, कंपनी तुमचा व्हॉट्सॲप नंबर ब्लॉक करू शकते. तुम्ही येथे नमूद केलेल्या चुका केल्यास, तुमचे खाते बॅन करण्यासाठी तुमच्यावर कारवाई केली जाऊ शकते.
WhatsApp चालवण्यासाठी थर्ड पार्टी ॲप्स वापरू नका. व्हॉट्सॲपसाठी थर्ड पार्टी ॲप्स वापरणे हे कंपनीच्या धोरणाचे उल्लंघन आहे. जीबी व्हॉट्सॲप, व्हॉट्सॲप प्लस आणि व्हॉट्सॲप डेल्टा यांसारख्या ॲप्सचा वापर केल्याने तुमचे व्हॉट्सॲप खाते बंद होऊ शकते.
तुम्ही दुसऱ्याच्या वैयक्तिक माहितीसह WhatsApp खाते तयार केल्यास तुम्हाला कारवाईला सामोरे जावे लागू शकते. तुम्ही फक्त तुमच्या तपशीलांसह WhatsApp वापरू शकता. दुसऱ्याच्या ओळखीसह WhatsApp वापरल्याने तुमचे खाते बॅन केले जाऊ शकते.
अनोळखी व्यक्तीला अनावश्यक मेसेज पाठवून तुमचे खाते देखील ब्लॉक केले जाऊ शकते. तुम्ही ओळखत नसलेल्या व्यक्तीला सतत मेसेज पाठवू नका. वारंवार संदेश पाठवणे किंवा अज्ञात व्यक्तींना त्रास देणे हे कंपनीच्या धोरणाचे उल्लंघन मानले जाते.
जर तुमचा व्हॉट्सॲप नंबर अनेक लोकांनी ब्लॉक केला असेल तर कंपनीसमोर तुमच्या अकाउंटची चुकीची इमेज तयार होते. या नंबरवरून स्पॅम किंवा फेक मेसेज पाठवले जात असल्याचे व्हॉट्सॲपला वाटते, त्यामुळे हा नंबर ब्लॉक केला जाऊ शकतो.
व्हॉट्सॲपद्वारे बेकायदेशीर संदेश पाठवणे किंवा अश्लील मजकूर पाठवणे किंवा धमकीचे संदेश पाठवणे हे धोरणाचे उल्लंघन आहे. तुम्ही व्हॉट्सॲपच्या नियम आणि अटी आणि धोरणाविरुद्ध कोणतेही काम केल्यास, व्हॉट्सॲप खाते ब्लॉक करण्याची कारवाई केली जाऊ शकते.