चिमुकल्यांचे “प्रगत रेल्वे’तून आगमन

सांगवी – नवा गणवेश, नवे दप्तर, नवी कोरी पुस्तके, नव्या वह्या, नवा उत्साह अशा उत्साही वातावरणात जुनी सांगवीतील अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या लिटल फ्लॉवर इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये विद्यार्थी प्रवेश जल्लोषात करण्यात आला. विद्यार्थ्यांचे सर्व शिक्षा अभियान प्रगत रेल्वेच्या संकल्पनेतून साकारलेल्या चित्रकलाकृतीतून आगमन झाले. या अनोख्या स्वागताने चिमुकले भारावून गेले होते. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा आरती राव, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अतुल शितोळे, तेजल कोळसे-पाटील तसेच सर्व शिक्षकवृंद आदी उपस्थित होते.

रांगोळीच्या पायघड्या घालून आणि गुलाबपुष्प देऊन शाळेच्या मुख्याध्यापकांनी चिमुकल्यांचे स्वागत केले. सर्व शिक्षा अभियान प्रगत रेल्वे हे चिमुकल्यांसाठी विशेष आकर्षण होते. शाळेचे प्रांगण विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने गजबजून गेले होते. शाळेचा पहिला दिवस मोठ्या उत्साहात सुरू झाला. नव्या पुस्तकांची नवलाई, रांगोळीने सजलेले प्रवेशद्वार आणि हातात गुलाबाचे फूल यामुळे चिमुकले भारावले होते. नव्या ओळखी करण्यात बालचमू मग्न होता. मुलांना शिक्षणाबद्दल गोडी निर्माण व्हावी, शाळेबद्दल आपुलकी वाटावी, या हेतूने मुलांचे कौतुक प्रगत रेल्वे संकल्पना राबवून चिमुकल्यांचे स्वागत करण्यात आले. मिकी माउसच्या हातात हात देऊन चिमुकले मजा लुटत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)