आयपीएलमुळे भारत आग्रेसर – आफ्रिदी

मॅंचेस्टर- विश्‍वचषक स्पर्धेत भारताने पाकिस्तानला 89 धावांनी पराभूत केले. हा भारताचा विश्‍वचषक स्पर्धेतील पाकिस्तान विरूद्धचा सर्वात मोठा विजय आहे. या विजयानंतर आफ्रिदीने भारतीय संघाची प्रशंसा करताना म्हटले की आयपीएलमध्ये तरूण खेळाडूंना दबावापुढे चांगली कामगिरी करण्याचे प्रशिक्षण मिळते.

ही स्पर्धा केवळ प्रतिभा शोधण्यासाठी नाही तर त्याला पैलू पाडण्याचेही काम केले जाते. तरूण खेळाडूंना प्रेशरमध्ये चांगली कामगिरी करण्याची शिकवण दिली जाते.

यापूर्वी जलद गती गोलंदाज वसीम अक्रमने बीसीसीआयची प्रशंसा करताना म्हटले की, भारतीय क्रिकेटने गेल्या वर्षांपासून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये चांगली गुंतवणूक केली आहे आणि आम्ही पाकिस्तानमध्ये प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये खूपच कमी काम केल आहे. आम्ही प्रत्येक वर्षी त्यात बदल करतो.

Leave A Reply

Your email address will not be published.