पिंपरी : महापालिका देणार जीवनसत्व व कॅल्शियमयुक्त गोळ्या

ज्येष्ठ नागरिक व गर्भवती महिलांना मोफत

पिंपरी, (प्रतिनिधी) – शहरातील करोनाचा वाढता फैलाव लक्षात घेता प्रभावी उपाययोजनांच्या दृष्टीने शहरातील ज्येष्ठ नागरिक आणि गरोदर महिलांची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी जीवनसत्व व कॅल्शियमयुक्त गोळ्यांचा मोफत पुरवठा करण्याबाबत महापौर माई ढोरे यांनी पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनास सूचना दिल्या आहेत.

पिंपरी चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रामध्ये “करोना’ विषाणूंचा प्रादुर्भाव आणि संसर्गाचा असणारा सर्वाधिक धोका ज्येष्ठ नागरिक व गरोदर स्त्रियांना अधिक प्रमाणात असल्याचे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे. त्यादृष्टीने महापालिकेने विविध पातळ्यांवर नियोजन व व्यवस्थापन केले आहे. त्याअंतर्गत शहरातील ज्येष्ठ नागरिकांना बी कॉम्प्लेक्‍स जीवनसत्वयुक्त गोळ्या तसेच गरोदर महिलांसाठी लोहयुक्त आणि कॅल्शियमच्या गोळ्यांचा मोफत पुरवठा करण्याच्या सूचना महापौर माई ढोरे यांनी महापालिका प्रशासन व वैद्यकिय विभागास दिल्या.

तसेच महापालिका कार्यक्षेत्रातील ज्या ज्येष्ठ नागरिकांना सर्दी, ताप, खोकला व इतर करोनासदृश्‍य लक्षणे आढळून आल्यास त्यांनी तात्काळ नजीकच्या महापालिका रुग्णालय अथवा दवाखान्यांमध्ये वैद्यकिय तपासणी करुन घेण्यासंबंधीचे आवाहन महापौर ढोरे यांनी केले. शहरातील ज्येष्ठ नागरिक संघांनी याबाबत पुढाकार घेऊन ज्या ज्येष्ठ नागरिकांना सर्दी, ताप, खोकला व इतर करोनासदृश्‍य लक्षणे आहेत त्यांना वैद्यकीय तपासणी व उपचाराकामी मार्गदर्शन करावे, असे आवाहनही यानिमित्ताने महापौरांनी केले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.